Breaking

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

राजवर्धन गुंडचे 10 वीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत उज्ज्वल यश


राजवर्धन गुंडचे 10 वीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत उज्ज्वल यश



माढा / प्रतिनिधी - माढा तालुक्यातील श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव (टें) संचलित, सीबीएसई बोर्डाच्या आर्या पब्लिक स्कूलमधील इयत्ता 10 वीचा विठ्ठलवाडी येथील विद्यार्थी राजवर्धन राजेंद्रकुमार गुंड याने 89.50 टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश प्राप्त केले आहे.

राजवर्धन गुंड याने इयत्ता 9 वीच्या इयत्तेतील गुण व 10 वीच्या शैक्षणिक वर्षांतील शाळेतील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे 600 पैकी 537 गुण प्राप्त केले आहेत. त्यास प्राचार्य सागर थोरात,मनोज नागटिळक,विद्या महाडिक,भैरवनाथ शिंदे,वंदना गोसावी,दत्तात्रय चव्हाण, राम माळी,स्वप्निल झांबरे यांचे मार्गदर्शन लाभले.तो विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक तथा पत्रकार राजेंद्र गुंड यांचा सुपुत्र आहे.

या यशाबद्दल त्याचे अभिनंदन आमदार बबनराव शिंदे,जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे,सभापती विक्रमसिंह शिंदे,शाळा व्यवस्थापच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे, गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील,गटशिक्षणाधिकारी मारुती फडके,विस्ताराधिकारी बंडू शिंदे, विकास यादव,केंद्रप्रमुख दिगंबर काळे,रोहिदास कापसे,मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण,सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळू गुंड,चेअरमन अनिलकुमार अनभुले,माजी सरपंच बालाजी गव्हाणे, डॉ.मोहन शेगर, रामचंद्र भांगे, संभाजी पाटील,अरुण माने, राजाभाऊ कदम,नेताजी उबाळे, सौदागर गव्हाणे,सज्जन मुळे,सतीश गुंड,सागर मोरे,सौदागर खरात, भिवाजी जाधव,कैलास सस्ते,शुभम सस्ते यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थांनी केले आहे.

फोटो ओळी - राजवर्धन गुंड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा