Breaking

शनिवार, २४ जुलै, २०२१

अंगणवाडीसेविका व आशासेविका यांचे कार्य कौतुकास्पद - राहुल पाटील



अंगणवाडीसेविका व आशासेविका यांचे कार्य कौतुकास्पद -  राहुल पाटील
वडूज प्रतिनिधी / शरद कदम

       कोरोना विषाणूने काही दिवसांपूर्वी संपूर्ण गावेच्या गावे संक्रमित केली आहेत. अशा भयंकर परिस्थितीच्या काळात व अगदी तुटपुंज्या मानधनात अंगणवाडी सेविका व आशासेविकांनी अनेक अडचणींवर मात करून कौतुकास्पद व अभिनंदनीय असेच काम केले आहे. त्यांचा आज होत असलेला सन्मान त्यांच्या कार्याचा उचित गौरवच म्हणावा लागेल. असे वक्तव्य जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, युवा नेतृत्व राहुल पाटील यांनी केले. ते भारतीय मजदूर संघाच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कोविड योद्धा सन्मान सोहळ्यात बोलत होते.
          सदर सन्मान सोहळ्यास शासनाच्या नियमानुसार कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमरसिंह देशमुख, दिपक घाडगे, मनिषा कुंभार, काझी, विकास कुंभार, विशाल देशमुख आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय मजदूर संघाच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त  संघाचे जिल्हाध्यक्ष शामराव गोळे व संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून भारतीय मजदूर संघाच्या वतीने कोरोना काळात महत्त्वपुर्ण भूमिका बजावत असणा-या अंगणवाडी सेविका व आशासेविका यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र, पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्री, आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
        यावेळी उपस्थितांचे स्वागत संघाचे प्रतिनिधी विशाल पवार यांनी केले. प्रास्ताविक उत्तमराव करळे यांनी केले तर आभार वहिद खान यांनी मानले. यावेळी अंगणवाडी सेविका, आशासेविका, भारतीय मजदूर संघ संलग्न बांधकाम कामगार महासंघाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा