Breaking

रविवार, २५ जुलै, २०२१

राष्ट्रीय महामार्गाच्या हिमायतनगर ते कोठारी निकृष्ट सिमेंट काँक्रिटच्या कामावर शिवसेनेचे झाडे लावा आंदोलन



राष्ट्रीय महामार्गाच्या हिमायतनगर ते कोठारी 
निकृष्ट सिमेंट काँक्रिटच्या कामावर शिवसेनेचे झाडे लावा आंदोलन

नांदेड जिल्हा  प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

राष्ट्रीय महामार्ग 161 हिमायतनगर ते कोठारी रस्त्याचे सिमेंट रोडचे काम चालू आहे. ते काम अत्यंत बोगस निकृष्ट दर्जाचे होत आहे त्याचा निषेध म्हणून किनवट तालुका शिवसेनेच्या वतीने होत असलेल्या रस्त्यावर हाताने खोदून झाडे लावा आंदोलन दिनांक 23 सात रोजी करण्यात आले. जर सुधारणा नाही झाली तर येणाऱ्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी उपोषणाचा इशारा व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तालुकाप्रमुख बालाजी पाटील मुरकुटे यांनी दिला आहे.
या संदर्भात अनेक दिवसापासून तालुका शिवसेनेच्या वतीने सूचना इशारा देण्यात येऊनही अद्याप कामात सुधारणा झाली नाही. तर आता 'लातो के भूत बातों से नही मानता' मनत शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. निकृष्ट रोड कामाच्या संदर्भात किनवट शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. आता आम्ही गप्प बसणार नाही वेळप्रसंगी रास्तारोको,उपोषणे करण्यात येतील काही जीवितहानी किंवा शासकीय व संबंधित यंत्रणेच्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही. असे बालाजी मुरकुटे यांनी झाडे लावा आंदोलनादरम्यान इशारा दिला आहे.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, उपसंघटक सुरेश घुमडवार, तालुका उपप्रमुख कपिल रेड्डी, शेख अजीज, किशन भिंगे, मोसिन चिखली,मुंडे इत्यादी शिवसैनिक व नागरिकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा