Breaking

रविवार, ६ जून, २०२१

गोकुंदा येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा


गोकुंदा येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
 
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवनगरी गोकुंदा येथे मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड व सर्व शिवप्रेमी बांधवांच्या वतीने प्रतिकात्मक पुतळ्याचे दुग्ध अभिषेक करून राज्याभिषेक साजरा करण्यात आला.

यावेळी मा.ज्ञानेश्वर कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज व शिवराज्याभिषेक याविषयी आपले विचार मांडले,छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या स्वातंत्र्य व सुखासाठी शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करून रयतेला दुःख मुक्त केले होते.आज जगाला प्रेम बंधुभाव एकात्मता शांतता समता समानता न्याय स्वातंत्र्य याची अत्यंत आवश्यकता आहे.त्यासाठी सर्वांनी मिळून एक सर्वसमावेशक सम्यक दृष्टी ठेवून न्यायबुध्दी वापरत बहुजन हिताय बहुजन सुखाय विचारधारा प्रत्यक्षात आणावी लागेल.असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील,मराठा सेवा संघाचे मा.तालुकाध्यक्ष प्रा.शिवराज बोकडे,तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम,प्रा.बालाजी मुडे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी पाटील सिरसाट,तालुकाध्यक्ष सचिन पाटील कदम,विनायक गव्हाणे पाटील,बळवंत शिंदे,गोविंद शिंदे,सुरेश घुमडवार,राजेश कदम,अंभोरे साहेब,गजू जाधव,सुमित माने पप्पू इरावार,रितेश मंत्री,गजानन माने,आकाश इंगोले,ईश्वर गुर्लेवाड विजय किनाके सदानंद पांचाळ,चव्हाण सर,गंगाराम शिंदे कपिल जाधव,मांजळकर सर,टाकळे साई जाधव यांच्या सह मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड व सर्व शिवप्रेमी समाजबांधव उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा