शेख महंमद बाबा देवस्थान विकासकामासाठी डॉ.संतोष हिरडे यांच्या कडून २५ ह.रु.मदत ,
.…...............................
आमीन शेख यांच्या कडे २५ ह.रु.धनादेश सुपूर्त ''
.....................
श्रीगोंदा प्रतिनिधि-
रमजान ईद व अक्षय तृत्तीया याचे औचित्य साधून श्रीगोंदा येथील सूफी संत शेख महंमद बाबा यांच्या देवस्थान विकासकाम,सुशोभिकरणासाठी पुरमपुज्य मोरे दादा हॉस्पीटलचे डॉ.संतोष हिरडे यांच्या वतीने शेख महंमद बाबा यांचे वंशज,ट्रस्ट चे अध्यक्ष अमीनभाई शेख यांच्या कडे २५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला आहे.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष फक्कडराव मोटे,मा.उपनगराध्यक्ष अख्तरभाई शेख,दत्ता जगताप, बंडूभाई शेख,अजिज शेख,गोरख कविटकर,महशे हिरडे,निखील भागवत,नितीन शिंदे,अल्ली शेख,विकास बोरूडे,राजु शेख,नितीन ननवरे,नंदकुमार चव्हाण,चॉंद शेख,रियाज शेख, सचिन शिंदे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना दत्ता जगताप म्हणाले की,कोरोना महामारीच्या काळामध्ये आज खरतर संपुर्ण समाज संकटात सापडलेला आहे.प्रत्येक जन जिवन जगण्यासाठी धडपडत आहे.आणि हे जिवन जगत असताना डॉक्टर सर्व समाजाला जिवन जगण्यासाठी जो आधार देत आहे त्यातील उल्लेखणीय नाव म्हणजे डॉ.संतोष हिरडे,आपल्या मोरे दादा हॉस्पीटलच्या माध्यमातून लोकांना सेवा देत आहेत.सेवा देत असताना सुद्धा कमीत कमी बिल आकारुण त्यांना उत्तम सेवा देण्याचा त्याचा जो सेवाभाव आहे.तो श्रीगोंदे करांना गेल्या एक वर्षापासून दिसून आलेला आहे.
रुग्णांकडून कमीत कमी बिल आकारुन सेवा देणारे डॉक्टर हिरडे यांनी एक सामाजिक भान लक्षात घेवून श्रीगोंद्यातील सूफी संत शेख महंमद बाबा देवस्थान विकास कामासाठी,सुशोभिकरणासाठी आज २५ हजार रुपयांचा धनादेश शेख महंमद बाबा यांचे वंशज,ट्रस्ट चे अध्यक्ष अमीनभाई शेख यांच्या कडे सपुर्त केला.
श्रीगोंदेकरांच्या वतीने डॉ.सतोष हिरडे यांचे मी आभार मानतो त्यांनी एक चांगला संदेश डॉक्टरांच्या माध्यमातून सर्व समाजाला दिला आहे.त्याची इतरानींही दखल घेवून अशाच पद्धतीने समाज हिताचे आपण काही तरी देणे लागतो,स्वःताचा प्रपंच सर्वजन नक्कीच करत असतात हे करत असताना समाजासाठी किंवा धार्मीक स्थळांसाठी आपण फूल ना फुलाची पाकळी दिली पाहिजे असा चांगला संदेश डॉ.हिरडे यांनी दिला आहे.असे दक्ष चे दत्ता जगताप म्हणाले.
शेख महंमद बाबा यांच्या देवस्थानच्या विकासकामासाठी डॉ.संतोष हिरडे यांनी जी मदत दिली त्या बद्दल शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट च्या वतीने अमीन शेख यांनी त्यांचे आभार व्यक्त करत म्हणाले की,कोरोना महामारी गेल्या नंतर सर्वांना बरोबर घेवून या देवस्थान चा विकास करणार असल्याचे सांगितले.
छाया-नितीन रोही


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा