*आलेगाव बु प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन बेड साठी निधी मंजूर*
***************************
*भिमानगर प्रतिनिधी/ धनंजय भोसले*
भिमानगर ( प्रतिनिधी) सध्या कोरोनाने महाराष्ट्रात थैमान घातले असुन आता शहराबरोबरच ग्रामिन भागांमध्ये कोरोना येऊन पोहोचला आहे.
त्यामुळे को़रोना सारख्या महाभयंकर रोगाला थांबवण्यासाठी आरोग्य केंद्रात लसीचा व ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून
टेंभुर्णी जि. प. गटातील आलेगाव बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राला 15 लाखाचा निधी आमदार फंडातून मंजूर केला असल्याचे आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला पंधरा लाख मंजूर केल्याबाबत टेंभुर्णी जि प सदस्या अंजना देवी शिवाजीराव पाटील व टेंभुर्णी जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधी शिवाजीराव पाटील यांनी ही माहिती दिली त्या बद्दल कोंढार भागातून आमदार बबनदादा शिंदे यांचे अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा