Breaking

रविवार, २ मे, २०२१

समाधान आवताडे यांच्या विजयाचा बेंबळेत मिठाई वाटून आनंद व्यक्त......


समाधान आवताडे यांच्या विजयाचा बेंबळेत मिठाई वाटून आनंद व्यक्त.......

बेंबळे।प्रतीनीधी।                 
                    पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे विजयी  झाल्याचे समजताच बेंबळे येथील अनेक तरुणांनी भाजपचे नेते व जिल्हा कार्यकारिणीचे माजी सदस्य रत्नाकर बेंबळेकर यांचे घरी जाऊन आपल्या विजयाच्‍या भावना व्यक्त केल्या. रत्नाकर बेंबळेकर देखील याप्रसंगी अतिशय खुशीत दिसून आले.,मोठे मालक स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाने वाहिलेली ही भावभिनी श्रद्धांजली आहे ,अशा शब्दात बेंबळेकर यांनी आपल्या भावना  व्यक्त केल्या.
      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 मे पर्यंत बेंबळे गावात जनता कर्फ्यू जाहीर झाला आहे, त्यामुळे जल्लोष करणे, गुलाल उधळणे, वाद्य वाजवणे, घोषणा देणे ,जयजयकार करणे आदी संपूर्ण  बाबीना फाटा देण्यात आला होता आणि रत्नाकर बेंबळेकर यांची घरी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून भाजप उमेदवाराच्या विजयाचा आनंद व्यक्त केला जात होता.भेटायला आलेल्या व्यक्तींना बेंबळेकर यांनी मीठाईचे वाटप केले. याप्रसंगी रत्नाकर बेंबळेकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, भाजपचे जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व समाधान आवताडे यांच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार आमदार प्रशांत परिचारक त्यांचे बंधू उमेश परिचारक खर्डी चे सरपंच प्रवीण परिचारक या सर्व मंडळींचे व सर्व कार्यकर्त्यांचे मनस्वी हार्दिक अभिनंदन करून आमदार समाधान अवताडे यांच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी नागनाथ हुलगे, मोहन सलगर, समाधान सलगर, सरपंच विजय पवार, महेश रामदासी, अशोक देवकर, अशोक काळे, बबलू काळे ,बिबीशन हुलगे, सुग्रीव मदडे, विभीषण पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा