कोरोणा सारख्या रोगापासून बचावासाठी विलगीकरण कक्ष उभारा-संभाजी ब्रिगेडची मागणी
उमरा ग्रामपंचायतीने शासकीय गोदाम ताब्यात घ्या.- बालाजी सिरसाट
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
सध्या सर्वत्र कोरोणाच संकट पहाता उमरा ग्रामपंचायतीने कोरोणा पासून बचावासाठी विलगीकरण कक्ष उभारण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे बालाजी सिरसाट यांनी केली आहे.
शासनाने कोरोनाची तिसरी लाठ्ठ येऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे.तसेच शासनाने आरोग्य सेवेसाठी ग्रामपंचायतींना भरीव असा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीने शासन स्तरावर प्रयत्न करून आगोदरच उपाययोजना म्हणून गावातील शासकीय गोदाम ताब्यात घेऊन त्या ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारावे.उमरा येथे आरोग्य उपकेंद्र असून तिथे डॉक्टर नर्स व MPW असून त्यांची याठिकाणी मदत घ्यावी.
त्याच बरोबर पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहेत.ग्रामीण भागात पावसाळ्यात घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिक बिमार पडू शकतात.त्यामुळे जेणेकरून गावातील वस्ती आजू बाजूच्या वाडी तांड्यातील काही रुग्ण त्या विलगीकरण कक्षात राहून आपला उपचार करू शकतील व कोरोनाची साखळी तोडण्यापासून बचाव होईलच परंतु इतरही साथीच्या रोगापासून बचाव या विलगीकरण कक्षाचा होईल.तसेच गावातील सत्ताधाऱ्यांनी आत्तापर्यंत शासकीय गोदामाचा घरगुत्ती वापर म्हणूनच केला.यामुळे शासकीय गोदामाचे प्रायव्हेटीकरण थांबेल व गावातील नागरिकांना गावातच विलगीकरण कक्षात राहून आपला उपचार करता येईल.याचा पाठपुरावा शासन स्तरावर करणार असल्याचे ही गावातील ग्रामस्थ,संभाजी ब्रिगेडचे बालाजी सिरसाट यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा