माढा मतदारसंघातील तीन ग्रामपंचायतींना ४० लाखांचा निधी मंजूर- रणजितसिंह शिंदे
माढा / प्रतिनिधी - जिल्हा वार्षिक योजनेच्या नागरी सुविधेअंतर्गत पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने आमदार बबनराव शिंदे यांच्या सहकार्याने माढा विधानसभा मतदारसंघातील ३ मोठ्या ग्रामपंचायतींना ४० लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे.
हा विशेष निधी मंजूर झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये माढा तालुक्यातील टेंभुर्णी व पिंपळनेर ग्रामपंचायतींचा समावेश असून दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी १५ लाख रुपये व पंढरपूर तालुक्यातील करकंब ग्रामपंचायतीस १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.टेंभुर्णी ग्रामपंचायतीने या निधीतून ननवरे वस्ती रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे व पेटकर वस्ती रस्ता डांबरीकरण करण्याचे काम करायचे आहे.पिंपळनेर ग्रामपंचायतीने या निधीतून पिंपळनेर ते लऊळ रस्ता करणे, करकंब ग्रामपंचायतीने गावांतर्गत वाडी वस्त्यांमधील रस्त्यांचे खडीकरण करायचे आहे.हा मंजूर झालेला निधी ९० टक्के शासनाकडून मिळणार आहे आणि १० टक्के ग्रामपंचायतीचा स्वहिस्सा असणार असल्याचे रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले आहे.
फोटो ओळी- जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा