Breaking

गुरुवार, ६ मे, २०२१

नाहाटा यांच्या कार्याची 'फोर्ब्ज' द्वारा दखल.



नाहाटा यांच्या कार्याची 'फोर्ब्ज' द्वारा दखल.
श्रीगोंदा-नितीन रोही

 तालुक्यातील गोर गरीबांचे नेते प्रवीणकुमार उर्फ बाळासाहेब नाहटा यांनी लोणी व्यंकनाथ (ता.श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथे ग्रामस्थांच्या मदतीने सुरू केलेल्या कोविड उपचार केंद्राची दखल राष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकाने घेतली आहे.फोर्ब्ज इंडिया या मॅगेझीन मध्ये नाहटा यांच्या वरील कार्या विषयी फोर्ब्जच्या पत्रकार नंदीका त्रिपाठी यांनी विशेष फिचर लिहून त्यांच्या कार्यास राष्ट्रीय पातळीवर नेले आहे.तालुक्यातील कोणाही नेत्याबाबत अथवा घटनेबाबत फोर्ब्जने आजवर घेतलेली ही एकमेव दखल आहे.
महाराष्ट्रात सध्या करोना चांगलेच हातपाय पसरवीत आहे.2 मे रोजी एका दिवसात राज्यात 56 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळल्याने परिस्थिती भयावह झाली आहे.राज्यात अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सध्या श्रीगोंदयात सापडत आहेत.अनेक रुग्ण दगावले आहेत.बऱ्याच रुग्णांना आवश्यक उपचार वेळीच उपलब्ध होत नसताना नाहाटा यांनी लोणीव्यंकनाथ सारख्या छोट्या गावात कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेले केंद्र रुग्णांना दीपस्तंभ प्रमाणे आश्वासक ठरले आहे.
फोर्ब्जने नाहटा यांचा संदर्भ घेत एका वृद्धेची कैफियत हृदयद्रावक शब्दांत मांडली आहे.करोनाग्रस्त असल्याने तिला कोणीही वाहन अथवा लिफ्ट दिली नाही.75 वर्षीय ही वृद्धा 12 कि.मी.पायपीट करीत उपचारांसाठी वणवण भटकत होती. नाहटा यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी तातडीने तिला उपचार केंद्रात भरती केले.ऑक्सिजन बेड मिळवून दिला.
तालुक्यात सुमारे पाचशे पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर मोफत उपलब्ध करून दिले.रात्री अपरात्री रुग्णांसाठी धावाधाव केली.एखाद्या सुसज्ज रुग्णालया प्रमाणे त्यांनी छोट्या गावात मोफत सुविधा करोनाग्रस्तांना मिळवून दिली.त्याचे सुपूत्र व लोणीव्यंकनाथचे उपसरपंच मितेश नाहटा यांनी   वडिलांच्या कार्यात खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.
हा सर्व खटाटोप करताना नाहटा यांनी स्वतःच्या आरोग्याची पर्वा केली नाही. अखेर त्यांना करोनाने ग्रासलेच.नगर येथे त्यांना ऍडमिट करावे लागले.HRCT स्कॅनचा स्कोर वाढल्याने सध्या त्यांना पुण्यात दाखल करावे लागले आहे.आयसीयू मध्ये असताना देखील त्यांना स्वतः पेक्षा आपल्या गावातील उपचार केंद्राची अधिक चिंता आहे.येणारे सर्वकॉल त्यांचे सहकारी घेतात.अन आवश्यक ती मदत तातडीने पुरवितात.

किर्लोस्करची टीम भेट देणार..!

वरील उपचार केंद्राला लागणाऱ्या विविध गरजा अन वैद्यकीय सामग्रीची गरज लक्षात घेऊन दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन फोर्ब्जने केले आहे.त्याला अनुसरून किर्लोस्कर समूहाची टीम लोणीच्या करोना सेंटरला भेट देणार आहे.अन्य दात्यांनी देखील या कामी पुढाकार घेतला तर बराचसा भार हलका होईल, अशी भावना श्री.नाहटा यांनी वरील मुलाखतीत व्यक्त केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा