पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उबाळे पोलिस महासंचालक सन्मानचिन्हाचे मानकरी
माढा / प्रतिनिधी- माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे सुपुत्र व सध्या नवी मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे हनुमंत पांडुरंग उबाळे यांना महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या निष्कलंक उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि सलग 15 वर्षे उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे.
या पुरस्काराची घोषणा महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी केली आहे.पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उबाळे यांनी नवी मुंबई येथे आतापर्यंत 35 वर्षे उत्कृष्टरित्या कामगिरी बजावल्याने शासनाने त्यांना एक वाढीव वेतन वाढ दिली आहे.त्यांनी या सेवेत गुन्हे व गुन्हेगारांच्या तपासासाची आणि शोधाची मोहीम अनेक वेळा यशस्वी केली आहे त्यामुळे शासनाने त्यांना आजतागायत वेगवेगळ्या कामगिरी बद्दल 275 बक्षिसे दिली आहेत. या सर्व कामगिरीबद्दल आणि त्यांचा सलग 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख असल्याने त्यांना बोधचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
त्यांचे अभिनंदन आमदार बबनदादा शिंदे,आमदार संजयमामा शिंदे,जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे,आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,पोलीस उपअधीक्षक सचिन कदम,पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम,सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ,समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मोहन शेगर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नागटिळक,सहाय्यक पोलिस निरीक्षक बिभिषण गव्हाणे,पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे,पोलीस उपनिरीक्षक अमोल अनभुले,पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग वाघमोडे, सहव्यवस्थापक अंकुश डुचाळ, उपशिक्षणाधिकारी नितेश कदम, उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे, चेअरमन अनिलकुमार अनभुले, सरपंच संगीता अनभुले,प्रा.छगन गुंड, विठ्ठल गुंड सर,डॉ.किशोर गव्हाणे, अनिलकुमार बरकडे,तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे,माजी सरपंच बालाजी गव्हाणे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे, पोलीस पाटील बालाजी शेगर,सौदागर गव्हाणे,नेताजी उबाळे,महावीर बरकडे,अंकुश शिंगाडे,सतीश गुंड, धनाजी सस्ते, दिनेश गुंड,सज्जन मुळे,समाधान कोकाटे,कैलास सस्ते, सौदागर खरात,दिनकर कदम, भिवाजी जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.
फोटो ओळी- पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उबाळे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा