Breaking

शुक्रवार, ७ मे, २०२१

बेंबळे येथे 107 नागरीकांना कोविड लसीकरण..... अद्याप शेकडो नागरिक लस मिळण्याच्या प्रतीक्षेत..



बेंबळे येथे 107 नागरीकांना कोविड लसीकरण.....
 अद्याप शेकडो नागरिक लस मिळण्याच्या प्रतीक्षेत..



          बेंबळे।प्रतिनिधी।     AJ 24 Taas News       

             वृत्तांत असा की बेंबळे या अकरा हजार लोकसंख्येच्या गावात कोविड लसीकरणाच्या आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये 107 नागरिकांना लसीकरण करण्यात आले, तरीही अद्याप गावातील शेकडो नागरिक लस मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक नागरिक टेंभुर्णी, परिते, मोडनिंब आदी ठिकाणी जाऊन पहिला केव्हा दुसरा डोस घेऊन आले आहेत.
            परिते प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत बेंबळे परिसर समाविष्ट आहे. या ठिकाणी एक उपकेंद्र असून एक आरोग्य सेविका कायम सेवेत असतात. बेंबळे गावासाठी दोनशे नागरिकांना कोविड   लसीकरण करण्याचे नियोजन होते, परंतु फक्त 107 डोस उपलब्ध झाले आहेत असे प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. आरती भारती यांनी सांगितले. या कोविड लसीकरण कॅम्पसाठी सरपंच विजय  पवार,  दादा भगत,रत्नाकर कुलकर्णी, मालक विश्वजीत भोसले ,ग्रामपंचायत सदस्य बबलू काळे, नामदेव कांबळे, दीपक किर्ते, भारत कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. येथील प्राथमिक शाळेमध्ये लसीकरणाला येणाऱ्या नागरिकांची सोशल डिस्टन्स, सँनेटर वापर, स्वच्छता आदी सर्व बाबींची व्यवस्थित सोय करण्यात आलेली होती. या कॅम्पसाठी डॉ. आरती भारती ,आरोग्य सहाय्यक पीएस पाटील, श्रीमती स्वामी ,आरोग्यसेविका एस एस पवार, पी डी कोरे, दीपक कोळपे ,सर्व आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी गावातील युवक कार्यकर्ते औदुंबर लोंढे, महेश रामदासी, अशोक देवकर ,सिद्धेश्वर शिंदे ,हनुमंत आनपट यांनीही दिवसभर सर्वांना चांगले सहकार्य केले. पोलीस पाटील बिभीषण  किर्ते व कॉन्स्टेबल भानवसे यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा