Breaking

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

कुर्डुवाडीत पोलिस खात्याच्या लॅबवरील धाडसत्राने सर्वं प्रशासकीय यंत्रणा चक्रावल्या...* *तीन पैकी एका लॅबने केली तपासणी बंद...रुग्णांना व्हॅटीलेटर दाखवणा-या दोन लॅब व्हॅंटीलेटरवर...कडक कारवाईची जनतेची मागणी...* *लॅबवाल्यांचे वैद्यकीय क्षेत्रांशी लागेबांधे उघड... गैरकृत्ये करणा-या रॅकेटचा पर्दाफाश..



*कुर्डुवाडीत पोलिस खात्याच्या लॅबवरील धाडसत्राने सर्वं प्रशासकीय यंत्रणा चक्रावल्या...*

      *तीन पैकी एका लॅबने केली तपासणी बंद...रुग्णांना व्हॅटीलेटर दाखवणा-या दोन लॅब व्हॅंटीलेटरवर...कडक कारवाईची जनतेची मागणी...*

     *लॅबवाल्यांचे वैद्यकीय क्षेत्रांशी लागेबांधे उघड... गैरकृत्ये करणा-या रॅकेटचा पर्दाफाश..?*





*✒️ AJ 24 Taas कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*आमचे प्रतिनिधी/अरुण कोरे पत्रकार .यास कडून


    *कुर्डुवाडी शहरांत "कोरोनो स्प्रेडच्या" पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी तीन खाजगी लॅबवाल्यांवर पोलिस खात्याच्या विशेष पथकानी धाडी टाकल्या नंतर इतर सर्व प्रशासकीय यंत्रणा चक्रावल्या असून त्यांच्यासह वैद्यकीय यंत्रणाही उघड्या पडल्या असून त्याही अचंबित झाल्या आहेत.*
    *पोलीस उपअधीक्षक विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल तीन पथकांनी अचानकच धाडी टाकल्याने शहरांसह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली.*
     *तीन लॅबवाल्यांची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.तसेच त्यांचे जाबजबाबही नोंदवले आहेत.आणखी कागदपत्रांची त्यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे.*
       *काल धाडी टाकलेल्या तीन लॅबपैकी माढा रोडवरील समर्थ लॅबने कालपासून तपासण्या करणे बंद केल्याचे दिसून येते.तर उर्वरित दोन लॅबवाले व्हॅंटीलेटरवर असून तपासण्या बंद करण्याच्या द्विधा मनःस्थितीत असल्याचे दिसून येते.*
      *कांही खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना हाताशी धरून यांचें एक रॅकेटच तयार झाले होते.यामध्ये कांही खाजगी डॉक्टरांचाही सहभाग असल्याचे दिसून येत असून पोलिस खात्याकडून सर्वं अंगांनी कसून चौकशी चालू आहे.*
       *खाजगी लॅबमध्ये विनापरवाना बेकायदेशीर अॅन्टीजन टेस्ट केली जात होती हे उघड उघड दिसून आले आहे.तर ज्यांचं उघडं पडलं नाही त्यांची चौकशी कायदेशीरपणे "पोलीसी खाकी"तून चालूच आहे.*
    *याबाबत प्रशासकीय पातळीवर संपर्क साधला असता ग्रामीण आरोग्य खाते स्थानिक न.पा.प्रशासनाकडे बोट दाखवत आहे.न.पा.प्रशासनाला चौकशी करता ते ग्रामीण रुग्णालयाकडे बोट दाखवत आहे.तर तहसील व पंचायत समिती कार्यालयांची काही जबाबदारी नाही का म्हणून उलट सुलट चर्चा केली जात आहे.*
     *या सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या वरदहस्तांनीच व अर्थपूर्ण लागेबांधीतूनच खाजगी लॅबवाले मोकाट सुटले होते.बुलेटिन्सच्या माध्यमातून गैरकृत्याचा पर्दाफाश केल्यानंतर फक पोलिस खात्यानेच गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई केल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणाही चव्हाट्यावर आल्या आहेत.अजूनही या यंत्रणांकडून कारवाईचे कोणतेच संकेत नसून कोमात की गेंड्याची कातडी पांघरत सोंगेच चालली आहेत याबाबत सर्वत्र उलट सुलट चर्चा केली जात आहे.*
     *याबाबत खरेच रॅकेट आहे काय? असेल तर त्यात कोणकोण सामील आहेत याचाही मागोवा पोलिस खात्याकडून कसून घेतला जातो आहे.*
   *या सर्व प्रकारात कोरोनो काळातही भ्यायलेल्या व पिचलेल्या समाजांचा गैरफायदा घेऊन जे रुग्णांची लूट करतायत आणि मृतांच्या टाळूवरचेही लोणी खाताहेत त्याबद्दल नागरिकांत तिव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी ठोस कडक कारवाई करावी अशी मागणी असून त्यांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले जात आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा