परीते आरोग्यकेंद्रात १०२८ लाभार्थ्यांना लसीकरण..
सज्जन शिंदे
बेंबळे प्रतिनिधी:- माढा तालुक्यातील परीते प्राथमिक आरोग्य केंद्रात १९ मार्चपासून आतापर्यंत १०२८ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकराणाचा लाभ घेतला असल्याची माहिती परीते आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सातपुते यांनी दिली.
परीते आरोग्य केंद्राच्या कक्षेमध्ये १३ गावांचा समावेश आहे. यापैकी लसीकरण झालेली गावनिहाय लाभार्थी संख्या याप्रमाणे परीते २२६, परीतेवाडी २५, घोटी ६५, वेणेगाव ७१, दगडआकोले ५१, चव्हाणवाडी ०७, बेंबळे ११६, मिटकलवाडी १०, वरवडे ३४, आकुंभे १५, व्होळे २५३, भुईंजे ०३, आहेरगाव २५ व इतर १२७ असे एकूण १०२८ लाभार्थ्यांनी लसीकरण करून घेतले आहे. यामध्ये काही गावांमध्ये अगदी नगण्य लसीकरण झाले आहे असे आकडेवारीवरून दिसून येते. राज्य सरकारने सध्या लावलेले कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत. यामुळे ग्रामीण भागात गावोगावी लसीकरण शिबीरांचे आयोजन करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
ग्रामीण भागात लसीकरण मोहीमेसाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग जनजागृती करत आहेत. नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने लसीकरणासाठी पुढे येण्याची गरज आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या ४५ वयाच्या पुढील लाभार्थ्यांनी परीते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता निर्धास्तपणे परीते आरोग्य केंद्रावर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ शिवाजी थोरात व परीते प्राथमिक केंद्राचे डॉ सातपुते यांनी केले आहे. लसीकरणानंतर सुध्दा सामाजिक अंतर, मास्क, वेळोवेळी सँनिटायझेशन ही त्रीसुत्रीचा अवलंब करणेही गरजेचे आहे. अशी सुचना देखील केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा