Breaking

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी करमाळ्यात सुसज्ज कोविड सेंटरसाठी प्रयत्न करावेत- सुदर्शन शेळके*



*प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी करमाळ्यात सुसज्ज कोविड सेंटरसाठी प्रयत्न करावेत- सुदर्शन शेळके*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

    करमाळा तालुक्यातील  कोरोनाचा प्रसार वाढत असून    सर्वसामान्यांचे हाताला काम नसल्याने कोविड उपचारांसाठी  पैसा  शिल्लक नाही. त्यामुळे प्रशासन व तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी तालुक्यात तातडीने सुसज्ज कोव्हीड सेंटर उभारणीसाठी प्रयत्न करण्याची मागणी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी केली आहे.
      सदर प्रतिनिधी बोलताना ते म्हणाले की,सरकारी दवाखान्यांमध्ये कोरोना पेशंटचे हाल होत .आहेत डॉक्टर नीट लक्ष द्यायला तयार नाहीत पुरेसे ऑक्सीजन नाही पुरेसे बेड नाहीत.लसिकरणाचे तिन तेरा वाजले आहेत.या गोष्टींकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. अशातच राजकारण्यांचे प्रतिष्ठेची लढाई चालू होते. व नगरपालिका अधिकारी व पोलीस सर्वसामान्यांना दंड लावतात. दवाखान्यामध्ये पुरेशा उपाययोजना नसल्यामुळे पेशंट दगावत आहेत याला जबाबदार कोण याचे उत्तर आमदार-खासदार, नगरपालिका अधिकारी ,सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरांनी  द्यावे .लोकांना वेठीस न धरता ज्या पोटतिडकीने अधिकारी लॉकडॉन चे पालन करायला सांगत आहेत त्याच पोटतिडकीने करमाळ्यात कोव्हीड सेंटरसाठी प्रयत्न करावेत असा खोचक टोला सुदर्शन शेळके यांनी यावेळी  लगावला. यावेळी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे,
ता.युवा अध्यक्ष अमोल घुमरे,
ता.पक्षाध्यक्ष बापू फरतडे,
ता.उपाध्यक्ष तानाजी शिंदे,
स्वाभिमानी नेते दीपक शिंदे,
बलभिम धगाटे व कांतीलाल शिंदे
उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा