*आठ दिवसाच्या आत विमा कंपनीने विमा वाटप चालू केला नाही तर कार्यालय फोडणार-दत्ता वाकसे*
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
यंदा सुरुवातीलाच अतिवृष्टीच्या पावसामुळे खरिपाची पिके खूप मोठ्या प्रमाणात जमीन उद्ध्वस्त झाली होती व शासनाने देखील नुकसानभरपाई पोटी नुकसान भरपाई दिली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर विमा कंपनीने मात्र याकडे कानाडोळा केला होता परंतु महाराष्ट्र सरकारने आपल्या हिस्सापोटी हप्ता पिक विमा कंपनीला गेल्या आठवडाभरापूर्वी आदा केला असून तात्काळ विमा कंपनीने शेतकऱ्याचा हक्काचा पीक विमा वाटप केला नाही तर शेतकऱ्यांना घेऊन विमा कंपनीचे कार्यालय फोडणार असल्याचा इशारा देत प्रसिद्धीपत्रक धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी दिले आहे
पुढे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ते म्हणाले की राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर अनेक संकट आलेले आहेत आणि त्या संकटाचा सामना करत असताना शेतकऱ्यांनी डगमगणे सोडून दिले नाही आणि झगडत राहिले परंतु गेल्या आठवडाभरापूर्वी महाराष्ट्र सरकारने आपल्या हिस्सापोटी आपल्या हिश्श्याची रक्कम विमा कंपनीला आदा केली असून आणि विमा कंपनी मात्र या गोष्टीला कोरोनाच्या नावाखाली कानाडोळा करताना दिसत आहे परंतु आम्ही जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाहीत शेतकरी रात्रंदिवस काबाडकष्ट करत आहे आणि त्यांना काबाडकष्ट केलेल्या कष्टाला जर न्याय मिळत नसेल तर आता मात्र आम्ही शांत बसणार नसल्याचे देखील त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे व पुढे ते म्हणाले की पिक विमा कंपनीने तात्काळ पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने विमा कंपनीचे कार्यालय फोडण्याचा इशारा दिलेल्या पत्रकात वाकसे यांनी दिला आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा