*चोरी गेलेल्या पंधरा मोटारसायकली एलसीबीने केल्या जप्त*
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
बीड शहरातील शहर पोलीस स्टेशन, शिवाजी नगर पोलीस स्टेशन यांच्या हद्दीतून अनेक मोटारसायकली चोरी गेल्या होत्या. यातील पंधरा चोरी गेलेल्या मोटार सायकलीचा शोध लावून त्या आरोपीसह सर्व मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत.
बीड शहरातील इमामपुर परिसरातील ढोले वस्ती येथील सराईत गुन्हेगार लक्ष्मण बाबुराव पवार याच्या घरात व परिसरात काही चोरीच्या मोटारसायकली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
यानंतर स्थागुशाच्या विशेष पथकाने सापळा रचून सदरील गुन्हेगारास विश्वासात घेवून त्याच्याकडून चोरीच्या मोटारसायकलची सविस्तर माहिती घेतली.
त्याच्याकडे 7 मोटारसायकलसह आणखी विश्वासात घेवून विचारपूस केल्यास त्याने माझ्या ओळखीचा भीमा बबन जाधव रा.काठोडा तांडा ता.गेवराई याच्याकडे 5 तर संदीप सोळुंके रा.निपाणी टाकळी ता.माजलगाव यांच्याकडे 3 अशा एकूण 15 मोटारसायकली ठेवल्या असल्याची कबुली केली.
यानंतर सर्व ठिकाणी जावून पोलीसांनी या दुचाकी ताब्यात घेत आरोपींवर गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या टिमने केली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा