भारतीय दलित संसद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पुणे (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी महादेव मिसाळ
इंदापूर : भारतीय दलित संसद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पुणे (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी बाभूळगाव ता.इंदापूरचे महादेव मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. संघटननेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अंबादास सगट तसेच कार्याध्यक्ष प्रा. बी. डी. खोतकर यांनी मिसाळ यांची जिल्हाध्यक्षपदी पदी निवड केली. भारतीय दलित संसद या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक व संवैधानिक चळवळीमध्ये राहून आपण काम करण्यास सक्षम असल्याने मिसाळ यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. महादेव मिसाळ म्हणाले की ग्रामीण भागातील तळागाळातील गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार असल्याचे मिसाळ म्हणाले, या पदाला साजेल आसा पदाधिकारी निवडल्या बद्दल मिसाळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे,


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा