Breaking

शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

विठ्ठलवाडीच्या मेघश्री गुंड हिचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उज्ज्वल यश माढा / प्रतिनिधी - माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील



विठ्ठलवाडीच्या मेघश्री गुंड हिचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उज्ज्वल यश  
माढा / प्रतिनिधी - माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी मेघश्री राजेंद्रकुमार गुंड हिने सावित्रीच्या लेकी विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 8 मार्च 2021 या जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व यशस्वी महिलांच्या कामगिरीविषयी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत लहान गटात तिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला आहे. 

मेघश्री गुंड हिने थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कारकीर्दीवर 500 शब्दात निबंधाची अत्यंत उत्कृष्ट व प्रभावीपणे मांडणी केली केली होती त्याचीच दखल घेऊन तिला लक्षवेधी क्रमांक देण्यात आला आहे.याकरिता तिला आई मेघना गुंड व सहशिक्षिका सुप्रिया ताकभाते यांचे मार्गदर्शन लाभले.विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक तथा पत्रकार राजेंद्र गुंड यांची ती कन्या आहे.  

यशाबद्दल तिचे अभिनंदन जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे,पोलिस उपअधीक्षक सचिन कदम, समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव,गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील,गटशिक्षणाधिकारी मारुती फडके,विस्ताराधिकारी बंडू शिंदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळू गुंड, मुख्याध्यापक सुभाष लोखंडे, केंद्रप्रमुख विष्णू बोबडे,प्रा.छगन गुंड, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उबाळे, चेअरमन अनिलकुमार अनभुले, लेखक डॉ.किशोर गव्हाणे,विठ्ठल गुंड सर,प्रा.कुंडलिक गुंड,डॉ.संतोष कदम, डॉ.नेताजी कोकाटे,क्षयरोग अधिकारी डॉ.मोहन शेगर,उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे,सरपंच संगीता अनभुले,माजी सरपंच बालाजी गव्हाणे,अनिलकुमार बरकडे,अरुण कदम,सुनील शेंडगे,तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे,वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,पोलीस पाटील बालाजी शेगर,अंकुश गवळी,गोरखनाथ शेगर, विजय काळे,राजाभाऊ कदम, शिवाजी कदम, नेताजी उबाळे,धनाजी सस्ते,सुशेन भांगे, सतीश गुंड,सुधीर गुंड,सज्जन मुळे,दिनेश गुंड, सुधाकर गव्हाणे,सागर मोरे,सोमनाथ खरात, दयानंद शेंडगे,सोमनाथ गुंड,समाधान कोकाटे,ब्रम्हदेव शिंगाडे,सौदागर खरात,दिनकर कदम,भिवाजी जाधव,कैलास सस्ते,गणेश दळवी, ज्ञानेश्वर शेंडगे,अशोक जाधव यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा