*लॉकडाऊनमध्ये लोक घरात बंद बँक वाल्यांनी वसुलीसाठी केले तंग सक्तीची वसुली थांबवा नाहीतर सामान्य जनता रस्त्यावर उतरतील ÷माढा तालुकार्याध्याक्ष सागर ढवळे*
टेंभुर्णी प्रतिनिधी..
दुष्काळात तेरावा महिना यावा आणि घरात बेजार लोकांचा जीवजावा अशी स्थिती निर्माण झाली आहे.सोलापूर जिल्हा दहा दिवस लोकडाऊनमध्ये असतांना लोक घरात बंद असतांना बँकवाले मात्र घरापर्यंत पोहचू लागले आहेत.कर्जाच्या वसुलीसाठी सक्ती केली जात असल्यामुळे आई जेऊ देईना अन बाप भीक मागू देईना अशी गत झाली आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सक्तीची वसुली थांबवण्याच्या सूचना द्याव्यात नसता लोकांना नाइलाजास्तव रस्त्यावर उतरावे लागेल.असा इशारा शिवस्वराज्य युवा संघटनेचे माढा तालुकार्याध्याक्ष सागर ढवळे यांनी दिला आहे.या संदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की गेल्या एक वर्षा पासून कोरोनामुळे बेकारी, बेरोजगारी वाढलेली असतांना
अनेकांच्या हाताचे रोजगार गेला आहे. 2020÷2021मधील चार महिन्याच्या लॉकडाऊन नंतर जनता जगण्यासाठी धडपड करत होती आत्ता कुठे गोरगरिब पुर्व पदावर आले होती की लगेच.जिल्हाधिकारी साहेब यांनी लाॅकडाऊनची घोषणा केली. असतांना पुन्हा शुक्रवारपासून जिल्हा लॉकडाऊन झाला.लोकांना घरात बंद राहण्याची वेळ आली असे असतांना बँकेचे लोक मात्र घरात मजबूर होऊन बसलेल्या लोकांना तंग करू लागले आहेत मार्चएन्डच्या नावाखाली हप्ता वसुलीसाठी दम देऊ लागले रात्री आठ वाजले तरीही वसूली करतात ते म्हणतात की तुम्ही काही करा पण आम्हाला आमचा हप्ता भरा असे कुठपर्यंत चालणार आहे हा प्रकार म्हणजे सावकारी वसुली सारखा दिसत आहे.हाताला कामधंदा नसताना घर चालवाचे कसे हा प्रश्न समोर असतांना ब्यांकेचा हप्ता भरायचा कसा.जिल्हाधिकारी यांचा आदेश म्हणतो घराबाहेर पडू नका अन बॅंकवाले म्हणतात हप्ता भरा हा प्रकार म्हणजे आई जेऊ घालिना अन बाप भीक मागू देईना या म्हणी प्रमाणे झाला त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी गोरगरीब लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा.नाहीतर बँकेची सक्तीची वसुली थांबवावी नसता लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.शिवस्वराज्य संघटन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महाराष्ट्रभर लोकाशाही मार्गाने जनआंदोलन केले जाईल.असा इशारा शिवस्वराज्य युवा संघटनेचे माढा तालुकार्याध्याक्ष सागर ढवळे यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा