राष्ट्रीय परिवहन विभाग नियंत्रकाचे आगार व्यावस्थापकांना प्रवाशांना शुद्ध पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश:-
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
______________________________
शासकीय कार्यालय तसेच बसस्थानक आवारातील पाणपोई कोरड्याठाक पडल्या असून उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असून आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना हे परवडणारे नसल्याने या मोफत पाणपोई सुरू करण्यात याव्यात अशी लेखी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांनी जिल्हाधिकारी, विभाग नियंत्रक बीड यांना दि.19 मार्च रोजी केल्यानंतर तसेच याविषयी विविध दैनिकातुन बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर निवेदनाची दखल घेऊन विभाग नियंत्रक रा. प.बीड यांनी सर्व आगार व्यावस्थापक गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर, पाटोदा, आष्टी यांना सध्या ऊन्हाळ्याचे दिवस असल्याने आपल्या अखत्यारीत असलेली बसस्थानकावर प्रवाशांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करण्याकरीता समाजसेवक, समाजसेवी संस्था, सेवाभावी संस्था व आपल्या मार्फत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी असे लेखी कळवले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा