Breaking

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

*कोरोना सर्व्हे दरम्यान आशा स्वयंसेविकेस शिविगाळ*तडवळेच्या फडतरे दांपत्याविरुद्ध तक्रारवडूज प्रतिनिधी / शरद कदम तडवळे ता. खटाव येथिल आशा स्वयंसेविका यास्मीन शेख यांचा कोव्हिड सर्वे सुरु असताना दांपत्याकडून शिविगाळ करण्यात आली. या बाबत अशा स्वयंसेविकेने वडूज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मिळालेली माहिती अशी की, यास्मीन शेख या तडवळे येथे आशा स्वयंसेविका म्हणून काम करतात. त्या गावातील कोरोना सर्व्हे करुन माहिती दररोज आरोग्य खात्याला देत असतात. गावतील खालचा खाडेमळा येथे कुटुंबाचा सर्व्हे करण्यासाठी गेल्या असता बबन आकाराम फडतरे व रंजना बबन फडतरे यांचेकडून आशासेविका शेख यांना शिवीगाळ करुन काही अपशब्द बोलण्यात आले. आम्हाला कोरोना झाला नाही, आमच्या घरी तपासणीला यायचे नाही. तुम्ही गावभर फिरता, तुमच्यामुळेच आम्हास कोरोना झाला. असे म्हणत शेख यांना शिविगाळ केली. आरोग्य खात्याचा पा्ठपुरावा घेवून यास्मीन शेख यांनी फडतरे दांम्पत्य यांचे विरुदध वडूज पोलिसांकडे




*कोरोना सर्व्हे दरम्यान आशा स्वयंसेविकेस शिविगाळ*

तडवळेच्या फडतरे दांपत्याविरुद्ध तक्रार

वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

           तडवळे ता. खटाव येथिल आशा स्वयंसेविका यास्मीन शेख यांचा कोव्हिड सर्वे सुरु असताना दांपत्याकडून शिविगाळ करण्यात आली.
          या बाबत अशा स्वयंसेविकेने वडूज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मिळालेली माहिती अशी की, यास्मीन शेख या तडवळे येथे आशा स्वयंसेविका म्हणून काम करतात. त्या गावातील कोरोना सर्व्हे करुन माहिती दररोज आरोग्य खात्याला देत असतात. गावतील खालचा खाडेमळा येथे कुटुंबाचा सर्व्हे करण्यासाठी गेल्या असता बबन आकाराम फडतरे व रंजना बबन फडतरे यांचेकडून आशासेविका शेख यांना शिवीगाळ करुन काही अपशब्द बोलण्यात आले. आम्हाला कोरोना झाला नाही, आमच्या घरी तपासणीला यायचे नाही. तुम्ही गावभर फिरता, तुमच्यामुळेच आम्हास कोरोना झाला. असे म्हणत शेख यांना शिविगाळ केली. आरोग्य खात्याचा पा्ठपुरावा घेवून यास्मीन शेख यांनी फडतरे दांम्पत्य यांचे विरुदध वडूज पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा