Breaking

बुधवार, १७ मार्च, २०२१

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट*



माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट*
****************************

*फलटण प्रतिनिधी/AJ 24 Taas News*

 दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी  भेट घेतली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्रातल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या वतीने  गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत करण्यात आले यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी कृषिमंत्री, राधाकृष्ण विखे पाटील, माजी महिला व बालकल्याण  मंत्री पंकजाताई मुंडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार रणजितसिंह  मोहिते पाटील, आमदार राहुल कुल, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परस्थिती ची संपूर्ण माहिती गृह मंत्री अमित शहा यांना दिली. महाराष्ट्र मध्ये कायदा आणि सुव्यवस्था चा कसा बोजवारा उडाला आहे.कोरोना ची परिस्थिती हाताळण्यात हे  सरकार अपयशी ठरले आहे तसेच भारतीय जनता पक्षाच्या पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये संपूर्ण आढावा गृह मंत्री अमित शहा यांना सांगण्यात आला. याच वेळी महाराष्ट्रातील साखर उद्योगाबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शिष्टमंडळाच्या वतीने संपूर्ण माहिती दिली. आज साखर कारखान्याची महाराष्ट्रातील परिस्थिती काय आहे. त्यावर येणाऱ्या अडचणी  राज्य सरकार साखर कारखाना ना करत नसलेले सहकार्य , तसेच आजारी साखर कारखान्यांना केंद्र शासनाने कशा पद्धतीने मदत केली पाहिजे व साखर धंदा हा  महाराष्ट्रात  मोठ्या प्रमाणा मध्ये  वाढण्यास कशी मदत होईल, तसेच साखर उद्योग बरोबरच साखर उद्योगाशी निगडित असणारे इतर व्यवसाय इथेनॉल, को जन या बाबत सरकारने काही भूमिका घेतल्या पाहिजेत याचीही माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण माहिती घेऊन यावर लवकरच तोडगा काढला जाईल व साखर उद्योगास बळकटी दिली जाईल अशी ग्वाही या शिष्टमंडळाला दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा