Breaking

गुरुवार, १८ मार्च, २०२१

निंबाळकर कुटुंबियांच्या जळीत गोठ्याची व जखमी जनावरांची दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी....


निंबाळकर कुटुंबियांच्या जळीत गोठ्याची व जखमी जनावरांची  दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी....

इंदापूर प्रतिनिधी- आदित्य बोराटे
   
      वडापुरी- हणुमानवाडी (ता.इंदापूर) येथील रहिवासी गोविंद बाळासो निंबाळकर यांच्या  जनावरांच्या गोठ्याला  शाॅर्टसर्कीटमुळे आग लागुन जनांवरांसह गायींचा गोठा आगीत जळुन खाक झाला होता.  यामध्ये चार जणावरे मृृृृत्यु पावली होती. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर बोलताना म्हणाले की गोठ्याला लागलेल्या आगीची घटना ही गंभिर असुन निंबाळकर कुटुबीयावर संकटाने घाला घातला.त्यामुळे या गरीब शेतकर्‍याचे कधीही भरून न येणारे नूकसान झाले ,असुन सदर शेतकर्‍याच्या दुख्खा:त आम्ही सहभागी असल्याचे म्हणाले.

     राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सदर घटनास्थळाची पाहणी करून व नुकसानग्रस्त शेतकर्‍यास शासन स्तरावरून तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दील्याने शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.

     नुकसानग्रस्त कुटुंबास शासनाकडुन जास्तीत जास्त मदत मीळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असुन लवकरात लवकर मदत कशी उपलब्ध करून देता येईल ,याबाबत संबधीत विभागातील अधिकार्‍यांशी चर्चा करून तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या सुचना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी दील्या. यावेळी नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे, गोविंद निंबाळकर, संदिप पिंगळे, दिपक पिंगळे, प्रकाश करगळ, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. भिमराव घुगे, सोमनाथ पवार,उमेश यादव, महेंद्र काळे यांचेसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.
————————————————————————

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा