Breaking

गुरुवार, २५ मार्च, २०२१

ग्रामपंचायत निवडणूक लढवणार्या प्रत्येक उमेदवारांने निवडणुक खर्च तातडीने सादर करा... आ.बबनदादा शिंदे 'अन्यथा सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी '



ग्रामपंचायत निवडणूक लढवणार्या प्रत्येक उमेदवारांने निवडणुक खर्च तातडीने सादर करा...
                                    आ.बबनदादा शिंदे

 'अन्यथा सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी '
 
           बेंबळे। प्रतिनिधी।        
AJ 24 Taas News Maharashtra                           -------------------------------------------------
         माढा विधानसभा मतदारसंघातील माढा तालुका, माळशिरस तालुक्यातील समाविष्ट चौदा गावे व पंढरपूर तालुक्यातील समाविष्ट 42 गावातील बर्याच ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15जानेवारी 21 रोजी पार पडल्या. त्या ठिकाणी निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक विजयी किंवा पराभूत उमेदवाराने आपला निवडणूक खर्च तातडीने निवडणूक आयोग कार्यालयाकडे सादर करावा अन्यथा यापैकी कोणालाही पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात एईल  व आयोगाच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल काही दंड किंवा शिक्षा होऊ शकेल, किंवा कांही कारवाई होऊ शकेल म्हणून ज्या व्यक्तीने ग्रामपंचायत निवडणूक लढविली असेल अशा सर्व विजयी किंवा पराभुत उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च निवडणूक आयोग कार्यालयाकडे तातडीने सादर करावा असे आवाहन आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे.
          वृत्तांत असा की 15 जानेवारी 21 रोजी जिल्ह्यातील 657 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण 6301 उमेदवार ग्रामपंचायत सदस्य पदावर निवडून आले. यामध्ये माढा तालुक्यातील 738 सदस्य, पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील 387 सदस्य,व माळशिरस तालुक्यातील 14 गावातील 112 सदस्य उमेदवार विजय झाले आहेत. गावातील प्रत्येक प्रभागांमध्ये उमेदवार म्हणून  िवडणूक लढविणार्‍या प्रत्येक व्यक्तीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंतचा सर्व खर्चाचा तपशील 30 दिवसाच्या आत निवडणूक आयोग कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे परंतु अद्याप देखील बऱ्याच जणांनी आपला निवडणूक खर्च सादर केलेला नाही त्यामुळे विजयी अथवा पराभूत कोणत्याही उमेदवाराने आपला निवडणूक खर्च तातडीने सादर करावा व तसे न केल्यास विजयी उमेदवारांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते व विजयी उमेदवारांचे सहित इतर पराभूत उमेदवारांना देखील भविष्यातील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही, त्यामुळे तातडीने संमधीतांनी आपला निवडणूक खर्च सादर करावा असे आवाहन आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा