Breaking

शनिवार, २७ मार्च, २०२१

लातूर जिल्ह्यात नवीन नियमानुसार चार एप्रिल पर्यंत अनेक अस्थापना राहणार बंद**लातूर जिल्ह्यात सोम्य लाँकडाऊन*

लातूर जिल्ह्यात नवीन नियमानुसार चार एप्रिल पर्यंत अनेक अस्थापना राहणार बंद*
*लातूर जिल्ह्यात सोम्य लाँकडाऊन*

प्रतिनिधि :जीवन भोसले (उदगीर) 

लातूर 26 जिल्ह्यातील  कोविड 19 चा वाजता प्रादुर्भाव  रोखण्यासाठी   ,   माघील काही दिवसांत कोविड 19 रुग्णामध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे निर्देशनास येत  आहे,  कोविड 19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना  करणे  आवश्यक असुन  त्याचाच एक भाग म्हणून संदर्भ क्र.7अन्वये लातूर जिल्ह्यातमध्ये काही निर्बंध लावण्यात आले आसून यामध्ये काही अतिरिक्त निर्बंध अवश्यक असल्याने याबाबात आदेश निर्गमित करण्याची बाब जिल्हा प्राधिकरणा च्या विचाराधीन होती, 
त्याअर्थी  पृथ्वीराज बि पी, जिल्हाधीकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरण लातूर,  साथरोग प्रतिबंध कायदा  1897अपत्ती व्यवस्थापण अधिनियम 2005व फौजदारी प्रक्रिया संहिता  1973 चे कलम 144अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत/ क्षेत्रामध्ये दिनांक 04/04/2021 रोजीपर्यंत खालील प्रमाणे निर्बंध लागू करण्यात आले आहेत,  

1)लातूर जिल्ह्यातील सर्व जीम,  व्यायमशाळा,  स्पोर्ट्स काँम्पलेक्स, योगा /नृत्य वर्ग, खेळाची मैदाने, सर्व क्रिडा प्रकारचे टूर्नामेंट वैयक्तीक क्रीडा प्रकार, / स्विमिंग पुल, पार्क ,अम्युजमेंट पार्क, पर्यटन स्थळे, ईतर करमणूकीचे ठिकान पुर्णत:बंद राहील,  

2)सर्व चित्रपटगृहे / व्हिडीओ गृह /नाट्यगृह/व्हिडीओ गेम पार्लर /प्लेईंग कार्ड रूम / मंगलकार्यालय, व सभागृह  बंद राहतील 
3) जिल्ह्यातील सर्व हाँटेल्स /बार/परमिटरुम /रेस्टाँरंट  या ठिकाणी बसून खाण्या पिण्यास मनाई असेल, केवळ पार्सल सुविधा उपलब्ध राहील, 

4) जिल्ह्यातील सर्व पान शाप,  /पान टपऱ्या / चहा टपऱ्या ईत़्यादी बंद राहतील, 
 
5)दिनांक 29/03/2021/साजरी होनारी होळी  / धुलीवंदन आणी  दि. 02/04/2021रोजीची रंगपंचमी हे प्रतीकात्मक पद्धतिने आपल्या कुटूंबात स्वगृही साजरी करण्यात यावी ,
6) अँटोरिक्षामध्ये प्रवासी संखेची मर्यादा वाहनचालक 1+2 तसेच अधीकृत खाजगी टेक्शी (काळी पिवळी) जीप मध्ये प्रवासी संखेची मर्यादा वाहनचालक 1+5 प्रवासी ईतकी असेल, 
7)खाजगी बसेस  / एस टी  / सिटी बसेस मध़्ये  नो मास्क नो एन्ट्री,  नियमाच्या पालनासह  सिटिंग क्षमते एवढे व्यक्ति प्रवास करतील  कोणत्याही परिस्थितित सिटिंग क्षमते पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करनार नाहीत 
8) सर्व निर्बंध  जसेच्या तसे 04/04/2021पर्यंत लागू राहतील 
  
या आदेशाचे उल्लंघन  झाल्याचे निदर्शनात  आल्यास संबंधितावर दंडात्मक  कार्यवाही करण्यात येईल अशी  अदेशाची आमलबजावणी करण्यात आली,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा