अनैतिक संबंधाच्या संशयावरून २१ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून..*
इंदापूर प्रतिनिधी- आदित्य बोराटे
निमगाव केतकी येथे घरकुल शेजारी राहणाऱ्या राणी किरण भोंग (वय २१) हिने आत्महत्या केली नसून,तिचा दोरीच्या साह्याने गळा आवळून खून केला असल्याची फिर्याद मुलीची आई सावित्री उर्फ अक्काबाई हरी नाळे (वय ४८ रा .नाळे वस्ती निमगाव केतकी) यांनी इंदापूर पोलिस स्टेशन मध्ये दिली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मृत राणीच्या सासूचे हुलगे नावाच्या व्यक्ती बरोबर अनैतिक संबंध होते. आणि त्या व्यक्तीचे राणी हिच्याशी ही अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिचा खून केल्याचा या फिर्यादीत म्हटले आहे.
इंदापूर पोलिसांनी पती किरण बाळू भोंग,सासु शोभा बाळू भोंग, सासरा बाळू ज्ञानदेव भोंग, व दीर सुनील बाळू भोंग यांच्याविरोधात भा.दं.वि ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धोत्रे अधिक तपास करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा