*आरोग्य विभाग कुर्डूवाडीच्या वतीने सनराईज इंग्लिश मिडीअमच्या विद्यार्थी व शिक्षकांची आरोग्य तपासणी*
टेंभुर्णी प्रतिनिधी/AJ 24 Taas News Maharashtra
श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित सनराईज इंग्लिश मिडीअम (गुरूकुल) स्कूल च्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांची आरोग्य तपासणी आज सोमवार दिनांक. २२/०२/२०२१ रोजी करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन योगेश बोबडे, सचिव सुरजा बोबडे, प्राचार्य सिद्धलिंगप्पा प्रभाकर, संस्थेचे समन्वयक शंकर सोनटक्के, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
'आरोग्यम् धनसंपदा' या उक्तीप्रमाणे प्रत्येकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आज संपूर्ण जग आरोग्य विभागाला व आरोग्य संघटनेला मदत करत आहे. मग आपण आपल्या शाळेपासून सुरू करू या अशा भावना संस्थेचे चेअरमन योगेश बोबडे यांनी व्यक्त केल्या. आजच्या कोरोणाच्या विळख्यात शाळेचा एकही घटक आपणास दिसणार नाही याची ग्वाही देतो असे म्हणले.
या तपासणीसाठी टेंभुर्णी आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर मोहसिन तांबोळी व परिचारिका शिवगंगा पाखरे, औषध निर्माता शरद कोकणी यांनी स्कूलच्या जवळपास ४५० विद्यार्थी व ३५ शिक्षक व १० सेवक यांच्या आरोग्याची तपासणी केली व आरोग्य विषयक सल्ले दिले व कोरोना काळात आरोग्य जपण्याचा आणि सांभाळण्याचा मंत्र दिला.
अशा पद्धतीने कोरणा तपासणी पूर्ण झाली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा