बेंबळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विजय पवार, उपसरपंच पदी नाना भोसले बिनविरोध....
बेंबळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडीनंतर सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगीचा फोटो,पार्टी प्रमुख पोपट अनपट, विष्णू हुंबे, कैलास भोसले आदी मान्यवरांच्या सहित.
बेंबळे। प्रतिनिधी।
बेंबळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर श्री सिद्धेश्वर ग्राम विकास आघाडीचे विजय शिवाजी पवार यांची तर उपसरपंचपदी नाना भारत भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे .15 जानेवारी रोजी 2021ते 2026 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री सिद्धेश्वर ग्राम विकास आघाडीचे 15 पैकी 12 सदस्य विजय होऊन सत्ताधारी विरोधी श्री विमलेश्वर आघाडीचा दारुण पराभव झाला होता., ग्रामपंचायत आरक्षण सर्वसाधारण जागेसाठी खुले होते .आज झालेल्या पदाधिकार्यांच्या निवडी मध्ये विजय शिवाजी पवार यांचा सरपंच पदासाठी तर नाना भारत भोसले यांचा उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्यामुळे अध्यासी निवडणूक निर्णय अधिकारी बि.डी. वाहेकर (बांधकाम उपविभाग करमाळा) यांनी या दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली, तलाठी डी.आर .नरळे व ग्रामविकास अधिकारी मधुकर माने यांनी अध्यासी अधिकाऱ्यांना सहकार्य केले. निवडीनंतर सरपंच व उपसरपंच तसेच नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सिद्धेश्वर विकास आघाडीचे प्रमुख पोपट अनपट, विष्णूपंत हुंबे, कैलास भोसले, राजेंद्र जगताप आदी मान्यवरांनी फेटे बांधून व पुष्पहार घालून सत्कार केला., याप्रसंगी गावातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यानंतर ग्रामदैवत श्री विमलेश्वरचे नूतन पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी दर्शन घेतले.
टेंभुर्णी चे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर सुशीलकुमार भोसले, पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम माने देशमुख, व अरुण कांबळे यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता ,त्यांना गावचे पोलीस पाटील बिभीषण कीर्ते यांनी सहकार्य केले. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर यावेळी सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते., सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा