Breaking

शनिवार, ९ जानेवारी, २०२१

पत्रकारांनी लेखणीच्या माध्यमातून सामाजिक व कृषी विषयक प्रश्न प्राधान्याने मांडावेत - केंद्रप्रमुख रोहिदास कापसे माढा प्रेस क्लबचे नूतन उपाध्यक्ष राजेंद्र गुंड सर यांचा सत्कार


पत्रकारांनी लेखणीच्या माध्यमातून सामाजिक व कृषी विषयक प्रश्न प्राधान्याने मांडावेत - केंद्रप्रमुख रोहिदास कापसे
माढा प्रेस क्लबचे नूतन उपाध्यक्ष राजेंद्र गुंड सर यांचा सत्कार


टेंभुर्णी / प्रतिनिधी - पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. त्यांच्यामुळेच समाजातील चांगल्या व वाईट घटना व सुख दुःखाचे प्रसंग समाजासमोर येतात.जरी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रसार सर्वत्र झाला असला तरी प्रिंट मीडियाचे महत्व आजही जनमानसात टिकून आहे त्यामुळे पत्रकारांनी सामाजिक व कृषीविषयक प्रश्न व समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडाव्यात असे प्रतिपादन माढा तालुक्यातील मानेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांनी केले आहे

ते कापसेवाडी-हटकरवाडी ता.माढा येथे संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात माढा प्रेस क्लबचे नूतन उपाध्यक्ष तथा आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक सुनिल खोत यांनी केले

याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण म्हणाले की, पत्रकार राजेंद्र गुंड सरांनी मानेगाव परिसरातील सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय,कृषी विषयक तसेच विविध शैक्षणिक बातम्यांना योग्य न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.त्यांच्या लेखणीतून मानेगाव परिसरातील अनेक प्रश्न व समस्या सातत्याने प्रशासनाच्या समोर पोहोचल्या आहेत त्यामुळे अनेक समाजोपयोगी प्रश्नांना वाचा फुटून काही प्रश्न मार्गीही लागले आहेत.यापुढेही या भागातील समाजोपयोगी प्रश्न त्यांनी आपल्या लेखनीतून सातत्याने मांडावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी सहशिक्षक तुकाराम कापसे, प्रवीणकुमार लटके,तनुजा तांबोळी, मानेगावचे माजी सरपंच शिवाजी भोगे,कलाशिक्षक सचिन शिरसागर सुधीर टोणगे, लहू गवळी, सागर राजगुरू यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






- कापसेवाडी ता.माढा येथे माढा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष राजेंद्र गुंड यांचा सत्कार करताना केंद्रप्रमुख रोहिदास कापसे, मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण व इतर मान्यवर.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा