*गणेश पाटील उत्कृष्ट लेखक पुरस्काराने सन्मानित*
जामनेर तालुका प्रतिनिधी :
विजय सुर्यवंशी
निर्भय विद्या प्रसारक संस्था धुळे आयोजित आई साहेब राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील मुकटी या गावात गुण गौरव व मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना तसेच गुणवंत विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कवी लेखक गणेश पाटील यांना उत्कृष्ट लेखक हा पुरस्कार देण्यात आला.गणेश पाटील हे खान्देश साहित्य संघाचे युवा विभाग अध्यक्ष असून अनेक साहित्य संमेलनात ते निमंत्रित साहित्यिक म्हणून उपस्थित राहिले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल प्रा.डॉ सदाशिव सूर्यवंशी, रमेश बोरसे ,रमेश राठोड, प्रविण पवार,दत्तात्रय कल्याणकर, चंद्रशेखर कासार, संजय धनगव्हाड, तुषार पाटील, विजय वाठोरे(साहिल) नांदेड, कुणाल पवार ,दिनेश राठोड ,वृषभ अहिरे यांनी अभिनंदन व तोंडभरून कौतुक केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा