जामनेर शिवसेना उपशहरप्रमुख पदीदिपक माळी नियुक्ती*
*जामनेर तालुका प्रतिनिधी/विजय सुर्यवंशी,जळगाव*
जामनेरचे तरूण तडफदार व्यक्तीमत्व आणि युवा नेतृत्व श्री. दिपक माळी सर यांची जामनेर शिवसेना उप शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिपक माळी सर हे न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपुर या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे उत्तम संभाषण कौशल्य आणि युवकांशी दांडगा संपर्क परिचय आहे. ते अनेक सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यात सहभागी होत असतात. सुशिक्षित युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग ही ते राबवत असतात. अपंग बांधवांच्या हक्कासाठी त्यांनी शहरात अपंग बांधवांचा मोर्चा ही काढलेला आहे.
दिपक माळी सर यांची जामनेर शिवसेना उप शहर प्रमुख पदी नियुक्ती झाल्या बद्दल डाॅ. मनोहर पाटील उपजिल्हा प्रमुख, सुधाकरशेठ सराप, अतुल सोनवणे, ज्ञानेश्वर जंजाळ, महेंद्र बिर्हाडे आदींनी कौतुक केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा