प्रहार अपंग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा सत्कार..
श्रीगोंदा-नितीन रोही
श्रीगोंदा तहसील कार्यालय,नगरपालिका यांच्या जनतेने विविध प्रकारच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांना केल्या होत्या त्यामुळे जिल्हाधिकारी भोसले यांनी शनिवारी दिनांक9 जानेवारी रोजी दुपारी 2:50 वाजता तहसील व नगरपालिका कार्यालयाला भेट दिली, या दोन्ही कार्यालयांमधील तहसीलदार व नगरपालिका मुख्यअधिकारी यांना जनतेच्या अडचणी समजून समजून घेऊन त्यावर उपाययोजना कराव्यात आणि जनतेला नेहमीच सहकार्य करावे तसेच दिव्यांग बांधवांना शासनाच्या नियमानुसार पुरवठा विभागातून दर महिन्याला 35 किलो धन्य द्यावे ही सूचना केली आणि नगरपालिकेला दिव्यांग बांधवांचा पाच टक्के निधी वाटप करावा या सूचना दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांचा सत्कार प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पोकळे,सुरेश गलांडे,डॉ सोमनाथ देवकाते, सतीश वराडे,ज्ञानदेव भैलुमे, अजित गायकवाड यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार केला,यावेळी उपस्थित तहसीलदार प्रदीप पवार, अप्पर तहसीलदार चारुशिला पवार, नायब तहसीलदार योगिता ढोले, निवासी नायब तहसीलदार नांदे मॅडम,पंचायत समितीचे प्रशांत काळे,आरोग्य अधिकारी डॉ नितीन खामकर,डॉ राजुले उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांचे प्रहार संघटनेचे प्रथम शहराध्यक्ष नितीन रोही यांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा