नऊ महिन्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत नागरी समस्यांवरून वादळ
३३ विषयांना मंजुरी; जलवाहिनीचा मुद्दाही गाजला
जालना ( प्रतिनिधी ) मनिषा मगरे :
कोरोना महामारी मुळे विलंब झालेल्या जालना नगरपालिकेची सर्वसाधारण सभा अखेर सोमवारी दि. 28 रोजी पार पडली असून विविध नागरी समस्या मुळे ही सभा वादळी ठरली. विरोधी बाकावरील नगरसेवकांनी शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या सुरुवातीलाच मांडून मुखाधिकर्यांना धारेवर धरले होते.
नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जालना नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. तत्पूर्वी सभेच्या सुरुवातीलाच विरोधी बाकावरील नगरसेवकांनी जालना शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन नागरी समस्यांचा पाढा वाचत मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह सभागृहात धारेवर धरले.
सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांनी महात्मा फुले मार्केटचा प्रश्न उपस्थित करत या मार्केटमध्ये जुन्या व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली. तर या इमारतीला पाडून तेरा वर्ष झालेली असताना देखील नवीन इमारत उभी राहत नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. नगरसेवक शहाआलम खान यांनी जुना जालना भागात 12 ते 16 दिवसात होणारा पाणीपुरवठा आणि पाणीपुरवठा सभापती करत असलेले पाणीपुरवठ्याची व्यवस्था यावर भाष्य करीत नगरपालिका कर्मचारी आणि कंत्राटदार काय करतात? असा प्रश्न मुख्याधिकाऱ्यांना विचारला.
नगरसेवक शशिकांत घुगे यांनी जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कधी करणार? असा सवाल उपस्थित करत मुख्याधिकारी यांना धारेवर धरले. यावर कुत्र्यांची नसबंदी करणार असल्याचे सांगत मुख्याधिकार्यांनी लवकरच एजन्सी नियुक्त करण्यात असल्याची हमी दिली. तर सर्वे क्रमांक 446 मध्ये झालेल्या अतिक्रमणावर शशिकांत घुगे यांनी लक्ष वेधले. जालना शहरातील बंद असलेल्या घंटागाड्या बाबतही या सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला.
चौकट
या विषयांना मंजुरी
नगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या देणे, समृद्धी महामार्ग करिता वृक्षारोपण करणे, जायकवाडी पाणी पुरवठा योजना नियमित चालविणे, संत गाडगेबाबा तलावाचे सुशोभीकरण, कंत्राटदार घुले यांच्या अर्जावर चर्चा करून निर्णय घेणे, पालिका कार्यालयाच्या परिसरात सीसीटीव्ही बसवणे, भूमिगत गटार योजनेचा प्रारंभ करून मुदतवाढ देणे, अमृत वन मधील बगीचा विकसित करणे, शौचालयातील मैला उचलण्यासाठी तीन नवीन वाहन खरेदी करणे, जालना शहरातील प्रत्येक भागात एकात्मिक बाल संरक्षण योजना अंतर्गत नगर बाल संरक्षण समिती स्थापना करणे, महात्मा फुले शॉपिंग सेंटर इमारत बांधणी, शुद्धीकरण केंद्रावर एक मेगावॅट क्षमतेचे सोलर पावर उभे करणे, शहरातील विविध चौकाचे नामकरण करणे यासह विविध ३३ विषयांना या सभेत मंजुरी देण्यात आली.
चौकट
शहरातील अनेक जागांवर भू माफियांचा डल्ला
जालना शहरातील अनेक ओपन स्पेस चे परस्पर फेर लावून त्यावर भू माफिया पीआर कार्ड बनवत बनवण्यात आल्याचा गंभीर आरोप शाहरुख खान यांनी केला. तर नगरपालिकेच्या अनेक मालमत्ता सुद्धा अशाच पद्धतीने भूमाफियांनी हडपल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा