Breaking

रविवार, २० डिसेंबर, २०२०

इंदापुर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन चालुच ठेवणार..अँड राहुल मखरे.





इंदापुर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन चालुच ठेवणार..अँड राहुल मखरे

इंदापुर प्रतिनिधी :शिवाजी पवार

कांदलगाव ता. इंदापुर  येथील बाबर ऊस प्रकरण चांगलेच रंगले असून याप्रकरणात भारत मुक्ती मोर्च्याचे राष्ट्रीय महासचिव अँड. राहुल मखरे यांनी इंदापुर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या कारभारा विरूद्ध दि १९ डिसेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या दबावाला बळी पडणाऱ्या अन्यायग्रस्त लोकांनी पोलिस महासंचालक व पोलिस अधीक्षक यांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या आहेत. परंतु पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर अद्याप कोणतीही वरीष्ठ अधिकार्‍याकडून कारवाई करण्यात आली नाही. यामध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा वरदहस्त आहे का ? की पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण या भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवत आहेत ?असा प्रश्न यावेळी लोकांना पडला असल्याचे मखरे यांनी सांगितले

 एखाद्या परिक्षेत्रात११ वर्षापेक्षा जास्त सेवाकार्य करता येत नसताना नारायण सारंगकर हे कोणाच्या आशीर्वादाने गेली १४ वर्षे कोल्हापूर परिक्षेत्रात काम करत आहेत याचीही चौकशी झाली पाहिजे असे मत अँड राहुल मखरे यांनी व्यक्त केले.अँड राहूल मखरे यांनी इंदापूर पोलिस स्टेशनच्या संदर्भात अनेक गंभीर स्वरूपाचे अरोप केले असून यामध्ये काटी येथील एका प्रकरणात मेडिकल सर्टिफिकेट असताना ३२६ ऐवजी ३२४ कलम लावून गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन होण्यासाठी मदत केली तसेच बळपुडी व इंदापूर येथील देवकाते-करे यांच्यावर खोट्या ३०६ चा गुन्हा दाखल करुन त्यांना अनेक दिवस जेलमध्ये ठेवले 

बेडशिगं येथील बन कुटुंबीयांचा मानसिक व शारीरिक अशा पद्धतीने छळ केला तसेच इंदापूर शहरातील गोरगरीब भटक्या विमुक्त लोकांना मारहाण करून धमक्या दिल्या प्रतिष्ठित व्यापारी लोकांना शिवीगाळ करून अपमान करून हाकलून दिले कांदलगाव येथील प्रवीण बाबर यांच्यावरही खोटा ३७९ चा गुन्हा दाखल केला व त्यांच्या आई व पत्नीला अश्लील शिवीगाळ करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं इंदापुर पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात शेकडो तक्रारी आहेत काही झाले तरी आम्ही या प्रकरणातून माघार घेणार नाही पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर जोपर्यत कारवाई होत नाही तो पर्यत बेमुदत धरणे आंदोलन माघारी घेणार नाही असे राहुल मखरे यांनी काल दि १९ डिसेंबर प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा