*कोरोना महामारी च्या काळात*
रेडा *गावातील प्रशासकीय अधिकारी* गायब...
प्रतिनिधी रेडा
शशिकांत सोनटक्के
रेडा गावात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस
वाढत चाललेली असून कोरोना ची साखळी तोडण्यास प्रशासन
साफ अपयशी ठरले असून ह्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासकीय
नात्याने ग्रामसेवक, प्रशासक,कृषी सहाय्यक, तलाठी,
आरोग्य कर्मचारी,व यावर नियंत्रण असणारे विस्ताराधिकारी आणि गट विकास अधिकारी सो.पंचायत समिती इंदापूर हे जबाबदार आहेत.
रेडा गावात ग्राम सुरक्षा दलाच्या
उत्कृष्ट कामगिरीमुळे व पोलीस पाटील यांच्या योग्य नियोजनामुळे व ग्रामसुरक्षा दल व रेडा गावच्या पोलीस पाटील यांच्या संयुक्त कामगिरीमुळे कोरोनाची साथ आल्यापासून मागील महिन्या- पर्यंत गावात एकही रुग्ण सापडला नव्हता हे केवळ ग्रामसुरक्षा दलाचे यश होते.
परंतु ग्राम सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यापासून प्रोत्साहनपर दिले जाणारे अनुदान वेतन न दिल्यामुळे ग्राम सुरक्षा दलाचे कर्मचारी कामात निरूत्साही आहेत असे दिसून येत आहेत.ग्रामसुरक्षा दल स्थापन झाल्यापासून केवळ एका महिन्याचे मानधन देण्यात आलेले आहे.त्यानंतर अद्याप पर्यंत एक रुपया देखील मानधन देण्यात आलेले नाही..
ऐन सणासुदीच्या काळात ग्रामसुरक्षा कर्मचाऱ्यांची दिवाळी
गोड न होता कडूच झाली,
यास ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामसेवक जबाबदार आहेत याकडे कोण लक्ष देणार ॽ
गेल्या पंधरा दिवसांपासून या गावात रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणारे कर्मचारी म्हणजेच ग्रामसेवक, तलाठी,कृषी सहाय्यक व आरोग्य कर्मचारी तसेच जिल्हा परिषद शाळेतील व माध्यमिक शाळेतील शिक्षक हे या गावात अद्याप पर्यंत दिसून आलेले नाहीत. तसेच यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना झालेल्या दिसून येत नाहीत.याबाबत माननिय गटविकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर श्री. परीट साहेब यांचेकडे भ्रमणध्वनीद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी तक्रार केली असता ग्रामसेवकास पाठीशी घालणारे मा. गटविकास अधिकारी श्री परीट साहेब हेच सर्वस्वी जबाबदार आहेत असे निदर्शनास आले व याबाबत ग्रामस्थांमध्येही चर्चा ऐकायला मिळत आहे .
रेडा ग्रामपंचायतीच्या 14 वा वित्त आयोगाचा लाखो रुपयांचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर पडून असताना यास जबाबदार असणाऱ्या ग्रामसेवक व प्रशासक यांच्या नियोजन शून्यत्येमुळे तसाच पडून आहे.रेडा या गावात शासन नियुक्त असणारे प्रशासक श्री बामणे साहेब, इंदापूर तालुक्याची गट शिक्षण अधिकारी
पदाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना गावाच्या कामकाजासाठी वेळ देता येत नाही
ही समजून घेण्याजोगी गोष्ट आहे.परंतु रेडा या गावास असणारे ग्रामसेवक श्री गायकवाड यांच्याकडे एकाच गावाचा पदभार असतानादेखील आठ दिवसातून एखाद्यावेळेस येतात आणि तेही तासभर थांबून गप्पा मारून निघून जातात. त्यामुळे रेडा गावाच्या विकासाचा पुरता बोजवारा उडालेला आहे.
रेडा गावाच्या विकासाबाबत काहीही देणे घेणे नसल्यासारखे सर्व संबंधित अधिकारी वागत आहेत.
करुणा माहामारी च्या काळात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक,
यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी
राहणे बंधनकारक असताना
वरील सर्व नियमांना तिलांजली देत मनमानी पद्धतीने वागत आहेत.
रेडा या गावात प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर कार्यकर्त्यांनी फेरफटका मारताना नागरिकांशी चर्चा केली असता गावात अंतर्गत रस्त्याचे, मूलभूत सुविधांचे अनेक
जटिल प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच रेडा गावातील ओढ्यालगत राहत असलेल्या दलित वस्तीतील नागरिकांवर पुराच्या पाण्यात घरात बसून अनेक रात्री काढाव्या लागल्या आहेत.याचे कारण ओढ्यावर लगतच्या शेतकऱ्यांनी केलेली अतिक्रमणे केल्यामुळे दलित वस्तीतील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महसूल खात्यास लक्ष देण्यास वेळ नाही.मागील झालेल्या पावसाचे पाणी दलित वस्तीत शिरले होते,त्याचे नुकसानीचे पंचनामे झाले असताना देखील अद्याप पर्यंत सदरील कुटुंबांना कसलीही मदत मिळालेली नाही.याकडेही महसूल खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
या वरील सर्व गोष्टींचा विचार करून रेडा गावातील करोणा महामारी रोकणे, तसेच या गावास विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने माननीय गट विकास अधिकारी, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सो यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचे विचार प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष शशिकांत सोनटक्के व शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना विचार व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा