Breaking

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

आदर्श शिक्षक राजेंद्रकुमार गुंड यांचे शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमात यश



आदर्श शिक्षक राजेंद्रकुमार गुंड यांचे शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमात यश




टेंभुर्णी / प्रतिनिधी - माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे रहिवासी व श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगांव (टें) संस्थेत मागील 19 वर्षापासून अध्यापनाचे उत्कृष्टरित्या कार्य करणारे आदर्श शिक्षक राजेंद्रकुमार बाळू गुंड यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने सन 2020 मध्ये घेण्यात आलेल्या शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम (DSM) परीक्षेत 95.25 टक्के गुण प्राप्त करून उज्ज्वल यश संपादित केले आहे.

राजेंद्रकुमार गुंड यांनी सन 1996 मध्ये भूगोल विषयांतून विशेष प्राविण्यासह शिवाजी विद्यापीठाची बीए ची पदवी व 1998 मध्ये एमए पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर येथे भूगोल व हिंदी विषयांतून प्रथम श्रेणीत बीएड चा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून प्रथम श्रेणीत हिंदी विषयाची पदवी प्राप्त केली.अध्यापनाचे कार्य सुरू असतानाच त्यांनी सन 2019 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मराठी विषयातून एमए ची पदवी प्रथम श्रेणीत मिळवली आणि सन 2020 मध्ये शालेय पदविका व्यवस्थापन अभ्यासक्रम (डीएसएम) चा कोर्स पूर्ण केला.हा अभ्यासक्रम माध्यमिक शाळेत नव्याने मुख्याध्यापक होण्यासाठी आवश्यक आहे.एकीकडे प्रभावीपणे अध्यापनाचे कार्य सुरू असताना दुसरीकडे आपले ज्ञान व नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती आत्मसात व अद्ययावत करण्यासाठी शिक्षण घेत असल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

सहशिक्षक राजेंद्रकुमार गुंड यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे त्यांना महात्मा गांधी साक्षरता मिशन बीड यांच्या वतीने दिला जाणारा 'ज्ञानमिञ' हा पुरस्कार 2 वेळा मिळाला आहे. तसेच डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा "महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार" मिळाला आहे.माढा रोटरी क्लबच्या वतीने दिला जाणारा "राष्ट्राचे शिल्पकार" पुरस्कार मिळाला आहे. गीतांजली कला महोत्सव अंबाजोगाई यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उपक्रमशील कलाध्यापक पुरस्कार प्राप्त झालेला आहे तसेच महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने सन 2018 ला "कृतीशील शिक्षक पुरस्कार" प्राप्त झाला आहे.विशेष बाब म्हणजे सन 1996 साली माढा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला आहे.सन 2019 मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कर्मयोगी आमदार बबनरावजी शिंदे राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

त्यांचे अभिनंदन संस्थापक आमदार बबनदादा शिंदे,आमदार संजयमामा शिंदे,जि.प.सदस्य रणजितसिंह  शिंदे,सभापती विक्रमसिंह शिंदे, सचिव पोपट खापरे, गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील,गटशिक्षणाधिकारी मारुती फडके,विस्ताराधिकारी बंडू शिंदे, उपशाखाप्रमुख मोहन कदम,माढेश्वरी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ लुणावत,प्राचार्य डॉ.महेंद्र कदम, पोलिस उपअधीक्षक सचिन कदम, युवानेते संदीप पाटील,सरपंच अरुण कदम,चेअरमन अनिलकुमार अनभुले,उपसरपंच अनिलकुमार बरकडे,डॉ.किशोर गव्हाणे,प्रा.हनुमंत कदम,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मोहन शेगर,समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव,डॉ.संतोष कदम,डॉ.नेताजी कोकाटे, प्रा.धोंडीराम कापसे,किरण चव्हाण, धनाजी राऊत,नेताजी उबाळे,सतीश गुंड यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा