*बबन बापू पाटील त्यांच्या निधनाने बहुजन समाजाचा आधार गेला राजकुमार ( बाबा ) धोत्रे*
*AJ 24 Taas News Maharashtra*
*****************************
*AJ 24 Taas News Maharashtra
*टेंभुर्णी (प्रतिनिधी) विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा परिसरातील गोरगरिबांच्या आधारवड माढा तालुक्यातील सर्वसामान्यांच्या हाकेला धावून येणारे बबन बापू पाटील यांच्या निधनाने टेंभुर्णी व परिसरावर शोककळा पसरले असून बबन बापू पाटील हे टेंभुर्णी व पंचक्रोशीत बहुजनांचे नेते म्हणून प्रसिद्ध होते. बबन बापू च्या जाण्याने बहुजनांचा आधारवड हरपला असे उद्गार अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार धोत्रे यांनी काढले . बबन बापू पाटील यांच्या निधनानंतर टेंभुर्णी मध्ये आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राजकुमार धोत्रे म्हणाले की बबन बापू पाटील एक अशी व्यक्ती होती. की टेंभुर्णी तील सर्व समाजातील गोरगरिबांना त्यांचा खास आधार होता. टेंभुर्णी तील वडार समाजासाठी तर ते एक मार्गदर्शक आधारस्तंभ होते. अकोले गावामध्ये कायमस्वरूपी राजकारणाचा केंद्रबिंदू असणारे बबन बापू अकोले खुर्द माढा तालुक्यात ही बापू म्हणून प्रसिद्ध होते. ते माढा तालुक्यातील अनेक संस्थांचे संचालक मार्गदर्शक होते. गेल्या पंधरा दिवसापासून ते कोरोना पॉझिटिव होते .परंतु त्यावर मात करून ते बरे झाले होते. असे असताना हृदयाच्या विकाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने माढा तालुक्यात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून टेंभुर्णी व परिसरातील गोरगरिबांच्या हृदयात यांचे स्थान कायम राहील असे भावपूर्ण उदगार राजकुमार धोत्रे यांनी काढले. बापूंच्या निधनाने पाटील कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरात आम्ही कायम स्वरूपी पाटील कुटुंबीयांसोबत आहोत असे म्हणून शेवटी बबन बापू पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
बबन बापू पाटील यांचे आज पहाटे चार वाजता पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. आज दुपारी त्यांच्या गावी दोन वाजता अकोले येथील शेतामध्ये अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधी वेळी माढा तालुक्यातील राजकीय, समाजिक व सर्व ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा