भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी पदविधरांची फसवणूक केली--नितीन झिंजाडे*
*AJ 24 Taas News Maharashtra
*अतुल वारे पाटील करमाळा*
पुणे पदवीधर मतदार,संघात गत निवडणुकीत पदविधरांचे आमदार म्हणून निवडून आलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी पदविधरांची घोर निराशा व फसवणूक केली असल्याची टीका राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले की भाजपने तरुणांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते.पदवीधरांना नोकऱ्या न देता त्यांचे रोजगार भाजप राजवटीत गेले आहेत.पदविधरांसाठी एकही काम आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले नाही.खोटे बोलून पदविधराकडून मिळवलेली आमदारकीचा वापर त्यांनी स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी केली आहे.राज्यात केंद्रात भाजपची सत्ता असताना देखील पदविधरासाठी उद्योग, व्ययसाय रोजगार उपलब्ध करुन देण्याऐवजी मंदिर बांधकाम,मंदिर प्रवेश,भाजप कार्यालयांची निर्मिती यावर लक्ष दिले आहे.यामुळे राज्यातील पदवीधर वर्ग यावेळी शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस च्या महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा राहणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा