Breaking

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

विद्यापीठ उप-परिसरातील विविध समस्यांबाबत विरोधी पक्षनेते मा.प्रवीण दरेकर यांना अभाविपचे निवेदन*========================


*विद्यापीठ उप-परिसरातील विविध समस्यांबाबत विरोधी पक्षनेते मा.प्रवीण दरेकर यांना अभाविपचे निवेदन*


========================

उस्मानाबाद (धाराशिव), प्रतिनिधी - प्रतिक भोसले

आज धाराशिव येथे माननीय प्रविण दरेकर विधान परिषद विरोधी पक्ष नेते यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसरा मधील विविध शैक्षणिक समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. धाराशिव जिल्ह्यात 2004 पासून विद्यापीठ उप-परिसराची सुरुवात झाली असून अद्यावत विद्यापीठातील समस्या सुटल्या नाही. 
1)विद्यापीठ उप-परिसर धाराशिव जिल्ह्यात असून देखील विद्यापीठ उप-परिसरात विद्यार्थी तक्रार केंद्राची व्यवस्था अजून देखील झालेली नाही.
2) विद्यापीठ उप-परिसरात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी मुलाच्या वस्तीगृहाची सोय विद्यापीठ  उप-परिसरात करण्यात यावी.
3) विद्यापीठ उप-परिसरात क्रीडा विषयातील कोणत्याही प्रकारचे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात नाही.
4)एम.पी.एस.सी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात यावी. 
5)विद्यापीठ उप-परिसरात विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संकुलन उपलब्ध नाही त्यामुळे क्रीडा संकुलनाची  व्यवस्था करण्यात यावी.
6) महामार्ग ते विद्यापीठ उप-परिसर पर्यंत विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मार्ग उपलब्ध नाही.
 अशा विविध विद्यापीठ उप-परिसरातील  समस्या घेऊन अभाविप ने माननीय कुलगुरू महोदय यांना अनेक वेळा निवेदन देऊन व आंदोलन करून देखील या समस्यांकडे पूर्णपणे कुलगुरू दुर्लक्ष करत आहेत. तरी आपण या समस्यांकडे लक्ष देऊन  लवकरात लवकर या समस्यांचे निवारण करावे अशा मागण्यांचे निवेदन मा.प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांना  देण्यात आले. यावेळी शहर मंत्री नितेश कोकाटे,समर्थ आगळे,तुषार भातलवंडे,शिवानी परदेशी,गंगाधर कोलमवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा