खेड बुद्रुक येथे साथ प्रतिष्ठाणचा कार्यक्रम संपन्न,;
स्वागत प्रसंगी मास्क वाटपाचा अनोखा उपक्रम
सुशिल गायकवाड/खंडाळा.
खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक येथे साथ प्रतिष्ठाणच्या शाखा क्रमांक २ ची स्थापना करीत असताना या कार्यक्रमातून मास्क वाटप करून एक अनोखा संदेश देण्यात आला.यावेळी आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे, मान्यवर व ग्रामस्थांना खेड बुद्रुक शाखेच्या वतीने हार, तुरे, नारळ आदींना फाटा देऊन कोविड 19 च्या धर्तीवर मास्कचे वाटप करुन स्वागत करण्यात आले व अनोखा दिशादर्शक संदेश देण्यात आला.तसेच यावेळी निवड झालेल्या पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
लोणंद शहर व पंचक्रोशीत सुमारे 10 वर्षांहून अधिक काळ निस्वार्थीपणे जनसेवेचे व्रत घेऊन कार्यरत असलेल्या साथ प्रतिष्ठाण या सामाजिक संघटनेने विविध प्रकारचे नागरि समस्या व अपेक्षा प्रकाश झोतात आणुन ते निवारण होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून पाठपुरावा करत आहे.लक्षवेधी आंदोलने,आलेले यश तसेच राबविण्यात येणारे विविध क्षेत्रातील लोकहिताय उपक्रम अशा कार्याच्या बळावर साथ प्रतिष्ठाण चा नावलौकिक सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात परिचित होत प्रेरणादायी ठरू लागला आहे.हेच कार्य सर्वत्र जोमाने करण्यासाठी हळू हळू शाखांची निर्मिती केली जाते आहे.
याप्रसंगी साथ प्रतिष्ठाण चे मुख्यकार्यकारिणी सदस्य हणमंतराव शेळके पाटील, कायदेशीर सल्लागार अॅड.विलायत उर्फ बबलूभाई मणेर साहेब, अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, खजिनदार सचिन चव्हाण, खेड बु. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भगवानराव ठोंबरे, सिव्हिल काँट्रॅक्टर सुरेश एकनाथ धायगुडे, सामाजिक कार्यकर्ते अरुण पडळकर या उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व शाखांच्या हितार्थ मार्गदर्शन सुचना देत शुभेच्छा दिल्या.
यावेळी खंडाळा तालुका कार्याध्यक्ष पदी सुखेडचे ओंकार रासकर, खेड बु. शाखा अध्यक्षपदी लक्ष्मण हाके, उपाध्यक्ष प्रथमेश रासकर, सचिव सौरभ जोशी, कार्याध्यक्ष दिपक साळुंखे, सदस्य मंगेश गाडे, जगदीश माने, साहिल मुलाणी, रितेश गांधी, रमेश वायदंडे, किरण ठोंबरे, गणेश ठोंबरे, करण वायदंडे आदीं नवनिर्वाचित कार्यकारिणीस नियुक्तीपत्रे देण्यात आले.यावेळी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मुख्य कार्यकारिणी सदस्य सुनिल रासकर यांनी मानले. यावेळी युवा वर्ग व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा