Breaking

बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

लोणंदमध्ये शिक्षक दांपत्याकडून शालेय विद्यार्थीनी दत्तक;साथ प्रतिष्ठाणच्या उपस्थितीत विद्यार्थिनीस शालेय साहित्य भेट

लोणंदमध्ये शिक्षक दांपत्याकडून शालेय विद्यार्थीनी दत्तक;साथ प्रतिष्ठाणच्या उपस्थितीत विद्यार्थिनीस शालेय साहित्य भेट



Aj 24Taas News Maharashtra
सुशिल गायकवाड/खंडाळा.

खंडाळा तालुक्यातील लोणंद मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींच्या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक दांपत्यांनी एका विद्यार्थिनीस शालेय दत्तक घेतले आहे.मृणाल जाधव आणि धनंजय जाधव असे त्या शिक्षक दांपत्याचे नाव असून इयत्ता ४ थीच्या वर्गात शिकत असलेली अंकिता पप्पू खुशवाह या गरजू
विद्यार्थीनीचा संपुर्ण वर्षाभराचा शालेय खर्च त्यांनी उचललेला आहे.दोन्ही शिक्षक दांपत्यांचा वाढदिवस याच महिन्यात संपन्न झाला असून याच वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी शैक्षणिक कार्यातून कृतिशीलपणे मदतकार्य करणारा अनोखा उपक्रम राबविला.यावेळी त्या मुलीस शालेय साहित्य भेट देण्यात आले.

लोणंद शहरासह आसपासच्या गावांतून असे उपक्रम साथ प्रतिष्ठाणकडून राबविण्यास जोरदारपणे सुरुवात करण्यात आलेली आहे.साथ प्रतिष्ठाणच्या अशा या प्रेरणादायी शैक्षणिक कार्याचे अनुकरण करणारे हे महत्वपूर्ण कार्य अनेकांकडून केले जात असते.याच कार्याची प्रेरणा घेत शिक्षक दांपत्यानी असाच वाढदिवस साजरा केला आहे.शिक्षक दांपत्य हे कायम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी उपलब्ध करीत असतात.यासाठी स्वतःच्या खर्चातून वर्ग सजावटी पासून शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी आणण्यासाठी त्यांच्या कडून काम केले जात असते.आज पुन्हा एकदा त्यांनी एका गरजू विद्यार्थीनीस वर्ष भराच्या शालेय खर्चासाठी शालेय दत्तक घेत महत्वाचे कार्य केल्याने लोकांमधून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होते आहे.यावेळी हे शैक्षणिक साहित्य देत असताना शिक्षक धनंजय जाधव, शिक्षिका मृणाल जाधव यांच्यासह साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, अनिल बाबर तसेच पालक उपस्थित होते.
"एक गरजू व हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये.त्यासाठी हा उपक्रम राबवून यातूनच आम्ही एक सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी अशा या कार्यासाठी सहकार्य करावे."
-धनंजय जाधव, मृणाल जाधव(शिक्षक दांपत्य)

"कोरोना महामारी संकटात आर्थिक दृष्ट्या दुर्बलता आल्याने कोणीही न खचता लोणंद व परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये.म्हणून साथ प्रतिष्ठाणकडे संपर्क साधावा.
अशा प्रतिकूल परिस्थितीत शिकत असलेल्या गरजु विद्यार्थ्यांना दानशूर मान्यवरांच्या सहकार्यातुन साथ प्रतिष्ठाण माध्यमातून शालेय दत्तक घेण्याचा प्रयत्न केला जाईल.याबद्दल दानशूर मान्यवरांनी सहकार्य करावे." 

-कय्युम मुल्ला,अध्यक्ष-साथ प्रतिष्ठाण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा