इंदापूर दि 03
तालुक्यातील पळसदेव याठिकाणी विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन समारंभ प्रविन माने यांच्या हस्ते पार पडला. यात पळसदेव गावच्या स्वागत कमानीचे काम हाती घेण्यात आले अाहे.
तसेच पळसदेव ग्रामपंचायत फंडातून गावात बसविण्यातआलेल्याहाय मास्ट दिव्याचे ही आज मा.बांधकाम व आरोग्य सभापती, तथा जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यासह पळसदेव येथे नाना चौक ते कै. सर्जेराव मोरे (नाना) या रस्त्याचाही आज माने यांच्याहस्ते उदघाटन समारंभ पार पडला. प्रविण माने यांच्या जिल्हा परिषद फंडातून २० लाख रुपयांच्या निधीतून हे काम पूर्ण झाले असून, "रस्त्याचे काम अतिशय गुणवत्तापूर्ण झाले असल्याचे खरोखर समाधान वाटते" असे प्रतिपादन त्यांनी या उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी केले.
तसेच नव्याने उदघाटन करण्यात आलेल्या या रस्त्यास माजी उपसरपंच कै. सर्जेराव जयराम मोरे यांचे नाव देण्यात आले. पळसदेव गावचे माजी उपसरपंच राहिलेल्या सर्जेराव मोरे यांनी गावासाठी अनेक चांगले उपक्रम राबविले.
त्यांच्या अकाली जाण्याने सर्व गावाला दुःख झाले असून, त्यांच्या वाचून निर्माण झालेली पोकळी कधीही न भरण्यासारखी आहे. मोरेंचे कायमस्वरूपी स्मरण रहावे यासाठीच समस्त ग्रामस्थांच्या वतीने या रस्त्याला व कमानीलाही त्यांचे नाव देण्यात आले असून त्याचा भूमिपूजन समारंभात सर्जेराव मोरे यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी माने यांनी दिली. तसेच लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी आपण जातीने लक्ष देणार असल्याचे माने यांनी यावेळी सांगितले.
पळसदेव याठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाळासाहेब काळे, मेघराज कुचेकर,संतोष काळे, भूषण काळे, संपत काळे, सुजित मोरे, दत्तात्रय शेलार, शरद काळे, निलेश रंधवे, धनाजी बनसुडे, अंकुश जाधव, रामदास बनसुडे, योगेश जगताप, अनिल खोत ,छाया रंधवे, अंजना शेलार, छगन बनसुडे, अनिल कुचेकर व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा