Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

विदर्भ तेलंगणाच्या धर्तीवर कापसाला हमी भाव द्यावा सभापती-अनिल कऱ्हाळे पाटीलनांदेड



विदर्भ तेलंगणाच्या धर्तीवर कापसाला हमी भाव द्यावा    सभापती-अनिल कऱ्हाळे पाटील

नांदेड प्रतिनिधी/बालाजी सिरसाट


किनवट व माहूर तालुक्यात विदर्भातील व तेलंगणातील शेतकरी जे व्हरायटी लावतात तेच व्हरायटी किनवट माहूर तालुक्यातील शेतकरी लावतात, असे असतानाही किनवट तालुक्यात लांब धाग्याचा कापूस उत्पादित होत नाही म्हणत 310 रुपये प्रतिक्विंटल भाव किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र कमी मिळत असल्याने हा दुजाभाव सीसीआयने (कॉटन काँर्पोरेशन ऑफ इंडिया) थांबवावा व लांब धाग्याकरिता दिला जाणारा तेलंगणा व विदर्भाच्या धर्तीवर भाव द्यावा.अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल कऱ्हाळे पाटील यांनी केली आहे. ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषिमंत्री यांच्याकडे करण्यात येणार आहे,असेही कऱ्हाळे पाटील यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा