Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

बावडा गावात घरोघरी सर्वेक्षण आरोग्य तपासणी मोहीम -अंकिता पाटील****



*बावडा गावात घरोघरी सर्वेक्षण  आरोग्य तपासणी मोहीम -अंकिता पाटील*

*इंदापूर :प्रतिनिधी शिवाजी पवार*
*AJ 24taas  news maharashtra*


इंदापुर[ प्रतिनिधी] दि.         बावडा येथे मंगळवार ( दि. १५ )  रोजी सकाळी घरोघरी जाऊन सर्वेक्षण व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
           ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती यांच्यामार्फत माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण  बावडा गावात ५० पथकांद्वारे आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आरोग्य सेविका यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ऑक्सी मीटर, पल्स मीटर व थर्मामीटरच्या साह्याने नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरु केली आहे. एका दिवसांमध्ये सर्व गावाचे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ करताना कु.अंकिता पाटील यांनी स्वतः आरोग्य तपासणी करून घेतली.आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीस कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्या कुटुंबातील सर्वानी  कोरोनोची  तपासणी करून घ्यावी,असे आवाहन यावेळी अंकिता पाटील यांनी केले. 

ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षण आढळून येतील, त्या नागरिकांची स्वॅब टेस्टिंग करण्यात येणार आहे. जेणेकरून भविष्यात वाढणार धोका टळेल व कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.कपिलकुमार वाघमारे, आरोग्य कर्मचारी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
______________________________
फोटो: बावडा येथे घरोघरी सर्वेक्षण मोहिमेचा शुभारंभ जि.प.सदस्या कु.अंकिता पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा