Breaking

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

स्वच्छतेचा डींगोरा पिटणार्‍या इंदापूर नगरपरिषदेचा स्वच्छतेचा अंबिका अपार्टमेंटमधील लोकांनी केला पद्राफार्श इंदापूर येथील अंबिकानगर येथे घाणीचे साम्राज्य.



स्वच्छतेचा डींगोरा पिटणार्‍या इंदापूर नगरपरिषदेचा स्वच्छतेचा अंबिका अपार्टमेंटमधील लोकांनी केला पद्राफार्श

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार

इंदापूर येथील अंबिकानगर येथे घाणीचे साम्राज्य.



स्वच्छ इंदापूर सुंदर इंदापूर हा इंदापूर  नगरपरिषदेला स्वच्छते बाबतचा देश पातळीवरील १४ वा व पश्र्चिम विभागातील ७ वा क्रमांक मिळाला अासुन नंबर घोषित झाल्यानंतर मोठा गाजावाजा करण्यात अाला. परंतु तो फार काळ न टीकता क्षणिकच ठरला कारण लगेचच नगरपालिकेचे व त्यांच्या स्वच्छतेचे खरेरुप फक्त कागदावरच असल्याचा दावा अंबिका अापार्टमेंट मधील सभासदांनी केला अाहे.

इंदापूर शहरातील अंबिका नगर येथील अंबिका अापार्टमेंट मध्ये ५६ कुटुंब गेली १० वर्षांपासून वास्तव्यास असून नगर पालिकेचे सर्व कर उदा.घरपट्टी, पाणीपट्टी, आरोग्य व  शिक्षण इ.लाखो रूपये कराच्या स्वरुपात नियमित भरत आहेत.परंतु वेळोवळी उपरोक्त मागण्या करुन देखील नगरपालिकेने अद्यापही मुलभूत सुविधा पुरवल्या नसल्याने येथील नागरिकांन तर्फे इंदापूर नगरपालिकेच्या विरोधात सोमवार दिनांक ३१-८-२०२० रोजी नगरपालिके समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.

अंबिका नगर येथील अंबिका अपार्टमेंट बी विंग मधील नागरिकांन कडून आपल्या  मागण्या पुर्ण करण्यात याव्यात यासाठी दि १० -८-२०२० रोजी मा नगराध्यक्षा तसेच मुख्य अधिकारी इंदापूर नगरपालिका यांच्या नावाने २६ जणांच्या सहीचे निवेदन देण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने नवीन ड्रेनेज पाईप लाईन, रस्ता, स्ट्रीट लाईट सारख्या ‌प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

येथील नागरिकांशी संवाद साधला असता इंदापूरच्या नगर अध्यक्षा अंकीता मुकुंद शहा व मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल हे अंबिका नगर येथील अंबिका अपार्टमेंट अस्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला अाहे. रस्ता व स्ट्रीट लाईटची मागणी करुन देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.रस्ता खराब असल्याने पावसाळ्यामध्ये व इतर वेळी रहदारी साठी अडथळा निर्माण होत आहे.अंकीता शहा  व नगरपालिका कर्मचारी यांंनी ड्रेनेज व येथील मुलभूत असुविधेची दुर्दशेची समक्ष पाहणी करून ड्रेनेज  रस्ता व स्ट्रीट लाईट लवकरात लवकर करून देण्याचे आश्र्वासन दिले. परंतु अद्यापही त्याच्यावर कोणतीही उपाययोजना केली नसून साधी दखलही नगरपालिकेकडून घेण्यात आली नाही. तसेच सर आपणास जाणीवपूर्वक मूलभूत सुविधा देण्यास जमत नसेल तर नगरपालिकेने आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे कर वसूल करण्यास येऊ नये अशा प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिल्या.  मागण्या पूर्ण न झाल्यामुळे सोमवार दिनांक ३१-८-२०२० रोजी  अंबिका आपार्टमेंट येथील नागरिकांकडून इंदापूर नगरपालिका समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत . अशी माहिती अंबिका अपार्टमेंट येथील नागरिकांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा