.
*रक्तलिखित अंदोलन केलेल्या सैनिकांच्या सन्मानासाठी डॉ शशिकांत तरंगे माढा तालुक्यामध्ये झाले दाखल*
*भिमानगर प्रतिनिधी- शरद पाटिल*
------------------------------------------
भिमानगर दि.
माढा तालुका धनगर ऐक्य अभियान समन्वयक रक्तलिखित सैनिक किसन देवकाते पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार डॉ शशिकांत तरंगे यांनी केले उपस्थित बांधवांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले
यावेळी समाज बांधवांच्या मनातील प्रश्न यावर चर्चा केली.१३ ऑगस्ट रोजी माढा तहसील कार्यालय येथे धनगर समाजाच्या वतीने रक्तलिखित आंदोलन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील २४८ तालुक्यांमध्ये तहसीलदार यांना व २२ जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन धनगर समाजाच्या मागण्यांबाबत समाजाचा एक आक्रोश म्हणून रक्त लिखित आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनासाठी स्वतःचे रक्त देऊन ज्या सैनिकांनी हे आंदोलन उभं केलं त्या सैनिकांच्या सन्मानासाठी महाराष्ट्र राज्य धनगर ऐक्य अभियानाचे संयोजक डॉ.शशिकांत तरंगे साहेब यांनी आंदोलनकर्ते किसन देवकते पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार सन्मान केला.
यावेळी दुर्योधन देवकाते पाटील, महादेव बिचकुले सर, विष्णू तात्या बिचकुले, विठ्ठल देवकते, महादेव देवकते, राजेंद्र दडस, वसंत देवकाते, सुनील पालवे, वसंत बिचकुले, केशव देवकाते पाटील, चंद्रकांत बिचकुले, उद्धव देवकते, नवनाथ बिचकुले, नवनाथ देवकते, चंदन बिचकुले, हरिदास माने, राजाराम देवकाते, अरुण बिचकुले, साधू बिचकुले, नितीन बिचकुले आदी उपस्थित होते.
------------------------------------------
--------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा