Breaking

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

खा.चिखलीकर यांची श्रम आणि रोजगार समितीवर निवड...


खा.चिखलीकर यांची श्रम आणि रोजगार समितीवर निवड...



नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

खा.प्रताप पाटील चिखलीकर यांची केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवर निवड करण्यात आली.या पूर्वी खा.चिखलीकर यांची केंद्रीय मंत्रालयाच्या विविध चार समित्यांवर निवड करण्यात आली आहे.

    खा.चिखलीकर यांच्यावर मोदी सरकारने चौथ्यांदा मोठी जबाबदारी सोपविली आहे. राज्याच्या राजकारणात सर्वात जास्त चर्चेत राहिलेले खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिल्ली दरबारी मोठी लोकप्रियता मिळवली आहे.केंद्रसरकार मधील अत्यंत महत्वाच्या अशा समित्यांवर खा.प्रताप पाटील चिखलीकर यांची यापूर्वीही निवड करण्यात आली आहे.रसायन व उर्वरक संसदीय स्थायी समिती इस्पात मंत्रालयाच्या परमार्षदात्री समिती आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या समित्यांवर खा.चिखलीकर यांची निवड करण्यात आली आहे. आता अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवरही खासदार चिखलीकर यांची निवड करण्यात आली आहे.या समितीचे अध्यक्ष केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री संतोषकुमार गंगवार हे असून या समितीत केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल व व्ही मुरलीधरण यांचा समावेश आहे.या नियुक्तीबद्दल खा.चिखलीकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा