नवादापंत्य लग्न मंडपातुन थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात,,
आधी कोरोना टेस्ट मग गृहप्रवेश.,
बेंबळे । प्रतिनिधी
कोरोना च्या भयामुळे अवघे जग त्रासालेले असताना शासनाने नागरिच्या अँटी रँपीड टेस्ट करुन घेण्याचे सत्र राबविले असले तरी नागरिकांतुन ,जनमाणसातुन या चाचणी ला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही.जनजागृती करुनही लोकं पुढे येताना दिसत नाहीत.याच काळात काल एका नवादापंत्याने लग्नमंडपातुन थेट आरोग्य केंद्र गाठले.,आधी अँन्टीजेन रँपीड टेस्ट केली.,आणि पुन्हा गृहप्रवेश केला.
सविस्तर वृत्त असे कि,बेंबळे येथील बापु सोपान शिंदे यांचे चिरंजीव शंभु याचा विवाह इंदापुर तालुक्यातील सरडेवाडी येथे मधुकर गोपाळ शिदें यांच्या श्रावणी या मुलीशी संपन्न झाला.मोजक्या नातेवाईकाच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पडला.लग्न सोहळा उरकुन घरी परतत असताना बेंबळे येथे गावी आल्यानंतर घरी जाण्याऐवजी थेट बेंबळे येथील प्राथमिक उपकेंद्रात वधुवर दाखल झाले.
या केंद्रात परिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डाँ. आरती भारती आपल्या टीमसह कोरोना चाचणी घेत होत्या.
नवरा-नवरी लग्नमंडपातुन या आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करण्यासाठी आले आहेत असे समजल्यानंतर सर्व गावकर्या समक्ष त्यांची अँन्टीजेन रँपीड टेस्ट (कोरोना चाचणी) घेतली.
यावेळी कुर्डुवाडी पंचायत समितीचे माजी.सभापती बंडुनाना ढवळे उपस्थित होते.त्यांनी या शिंदे नवादापंत्याचे कौतुक केले..कोरोना चाचणी करणं किती गरजेचे व महत्वाचे आहे हे पटवुन सांगितले.सर्व नागरिकांनी स्वःता पुढे आले पाहिजे.या नव वरवधु ने आपल्या पुढे एक आदर्श ठेवला असुन या कोरोना चाचणीचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. आपल्या परिसरात जास्तीत जास्त अँन्टीजेन रँपीड टेस्ट करण्यासाठी जिल्हापरिषदेच्या मा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा