Breaking

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

*टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी रयत क्रांती संघटना पाठपुरावा करणार- प्रा सुहास पाटील*

.
*टेंभूर्णी येथे ५० खाटांचे ऊपजिल्हा रूग्णालय मंजुरीचे निवेदन देताना राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी सदस्स प्रा सुहास पाटील,बशीर जहागीरदार,जगदीश मस्के,विश्वजीत पाटील आदी*




*टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी रयत क्रांती संघटना पाठपुरावा करणार- प्रा सुहास पाटील*

------------------------------------------ 

*भिमानगर /प्रतिनिधी*

. टेंभुर्णी (प्रतिनिधी)- माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी माजी कृषी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांचेमार्फत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती रयत क्रांतीचे जिल्हा समन्वयक तथा राज्य कृषि मूल्य आयोगाचे माजी सदस्य प्रा.सुहास पाटील यांनी सांगितले. टेंभुर्णी येथे हे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते बशीर जागीरदार यांनी शासनाकडे १६/८/२०१८ रोजी प्रस्ताव दाखल केला होता.उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची तपासणी करून सर्व्हे अहवाल तयार झाला.तत्कालीन पालकमंत्र्यांच्या पत्रानुसार सहसंचालक,आरोग्य सेवा रुग्णालये (राज्यस्तर)मुंबई यांनी टेंभुर्णी येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजुरीचा प्रस्ताव दिनांक ८/७/२०१९ ला आरोग्य मंत्रालयाकडे सादर केला होता.परंतु अद्याप पर्यंत शासनाकडून उपजिल्हा रुग्णालया संबंधी कोणतीच कार्यवाही झाली नाही. या प्रश्नांबाबत आंम्ही आ. सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर निवासस्थानी भेटून संघटनेच्यावतीने निवेदन दिले.रूग्णालयासंबधी सविस्तर चर्चा होऊन आ सदाभाऊ खोत यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना तातडीचा ईमेल करून पत्र व्यवहार केला. सध्या टेंभुर्णी व टेंभुर्णी परिसरामध्ये ते कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालयाची अत्यंत गरज भासत आहे. टेंभुर्णी परिसरातील २० ते २५ गावातील नागरिकांची रुग्णालय व औषध उपचारासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्ही माजी कृषी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांचेमार्फत शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत,असे प्रा सुहास पाटील यांनी सांगितले. " टेंभुर्णी येथे हे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी विधान परिषदेत प्रश्न मांडुन आरोग्य मंत्र्यांकडे मंजुरीबाबतचा पाठपुरावा करणार आहे.टेंभूर्णी शहर सर्व राष्ट्रीय महामार्गांनी जोडल्यामुळे अपघातातील गरजु रूग्णांना औषधऊपचार तातडीने मिळणेसाठी ऊपजिल्हा रूग्णालयाची गरज आहे."आमदार सदाभाऊ खोत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा